वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

जिल्हाधिका-यांकडून ब्रीज बंधारा व लिफ्ट इरिगेशनची पाहणी*

*जिल्हाधिका-यांकडून ब्रीज बंधारा व लिफ्ट इरिगेशनची पाहणी*

चंद्रपूर, दि. 6 मार्च : 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत जिल्हास्तरीय अधिका-यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस क्षेत्रीय भेटीदरम्यान  केंद्र व राज्य शासनाच्या प्रकल्पांना भेटी देऊन कामाच्या प्रगतीची पाहणी करावी, अशा राज्य शासनाच्या सुचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मुल तालुक्यातील मौजा चिरोली येथे ब्रीज बंधा-यांची तसेच लिफ्ट इरिगेशनची पाहणी केली.

 यावेळी मुलचे उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार मृदुला मोरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी निलिमा मंडपे, गटविकास अधिकारी श्री. राठोड, चिरोलीच्या सरपंच मिनल लेनगुरे, कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे तसेच उपअभियंता सार्वजनिक बांधकाम व गावातील व्यक्ती उपस्थित होते.

पाहणी करीत असतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी ब्रीज बंधारा दुरुस्तीबाबत जलसंधारण अधिकारी यांना सूचना दिल्या. तसेच चिरोली गावातील पाणीपुरवठा योग्यरितीने करण्या बाबत सरपंचांना सांगितले.

*चिमढा येथे मानव विकास अंतर्गत गोडाऊनचे उद्घाटन :* जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मुल तालुक्यातील चिमढा येथील मानव विकास अंतर्गत गोडाऊनचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी संपूर्ण गोडाऊनची पाहणी केली. त्यानंतर गोडाऊन परिसरात वृक्षारोपण करून उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. तसेच नागरिकांनी सांगितलेल्या समस्यांची तात्काळ दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.

००००००

Comments