न.प.निविदा प्रक्रियात जाचक अटी असल्याचा स्थानिकांचा आरोप.

न.प.निविदा प्रक्रियात जाचक अटी असल्याचा स्थानिकांचा आरोप.
वरोरा:-
गेल्या अनेक वर्षापासून वरोरा नगर परिषद मध्ये निविदा प्रक्रियेत घोळ असल्याने विशिष्ट व्यक्ती कंत्रादारांला लाभ मिळावा यासाठी नगर परिषद मुख्याधिकारी हे प्रयत्नरत असल्याचे दिसून येत आहे, या निवेदा विरोधात सामाजिक कर्यकर्त, माजी नगरसेवक, काही कंत्राट दार यांनी आक्षेप घेत ही निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे. 
नगर परिषद वरोरा कार्यालयाने ई-निविदा सुचना सन 2024-25/ न.प.व./स्व.वि./38 दि.7/02/2025 ला नालीसफाई या सदराखाली  निविदा प्रसिद्ध केली व त्याची अंतीम मुदत दि.20/02/2025 ही ठेवण्यात आली.  निविदेतील कंत्राटदाराच्या पात्रतेसंबंधी नगर परिषद कार्यालयाकडून जाचक अटी ठेवण्यात आल्या असल्याचे मत व्यक्त केले.राज्य शासनाचे ज्या परिपत्रकान्वये /आदेशान्वये व नियमानुसार सदरचे कागदपत्रे  बंधनकारक असून ती कोणत्या शासनपरिपत्रकाचे/आदेशाचे / नियमानुसार आहे याबाबतची माहिती मिळविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल जानवे यांनी  दि. 14/02/2025अर्ज केला होता. त्यात  निविदेच्या जाचक व क्लिष्ट शर्ती , अटी ठरविण्याबाबत मा. मुख्याधिकारी यांना शासनाने जे विशेषाधिकार प्रदान केले आहेत त्या विशेषाधिकार परिपत्रकाची / नियमाची/आदेशाची सत्यप्रत मागविली होती.  तरीही कार्यालयाने दि. 18/03/2025 रोजी नालेसफाई कामासंबंधीची निविदा पुन्हा प्रकाशित केली. आहे त्यात पूर्वीच्या अटी मध्ये अट क्रमांक 1व अट क्रमांक 17 यात नमूद केल्याने  कंत्राट दार प्रमोद पिंपलकर व बबलू बरसे यांनीही निवेदे बाबत आक्षेप घेतला आहे  दि.18/03/2025 ला प्रकाशित निविदेमध्ये कुठलाही बदल न करता उलट साफसफाईच्या कामामध्ये एमजीपी प्राधिकरणाचे नोंदणीकृत प्रमाणपत्र बंधनकारक केलेले आहेत. जे की साफसफाईच्या कामासंदर्भात कुठलाही संबंध नसताना व अशाच इतर जाचक व क्लिष्ट अटी व शर्ती टाकून एखादया विशिष्ट हितसंबंधीत व्यक्ती किंवा संस्थेला लाभ पोहचविण्याच्या उद्देशानेच सदर निविदा प्रक्रिया राबविण्याचा दृष्टहेतू दिसून येत असल्याने माजी नगरसेविका प्रणाली संदीप मेश्राम यांनी ही दि.25 मार्चला दुपारी बारा वाजता निवेदनाद्वारे  आक्षेप नोंदविला आहे . तसेच  निविदा प्रक्रिया रद्द करण्यात यावी , अशी मागणी निवेदनातून सामाजिक कार्यकर्ते राहुल जानवे, संदीप मेश्राम, किशोर टिपले,प्रमोद पिंपळकर, बबलू बरसे यांनी केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते राहुल जानवे,संदीप मेश्राम यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता या नगर परिषद व कंत्राट दार यांचे संगनमत असल्यानेच अश्या प्रकारच्या शर्ती अटी टाकून वारंवार निविदा काढण्यात येत आहे, त्यामुळे प्रामाणिक स्थानिक, गरजू बेरोजगार कंत्राट दार यांना कामापासून मुकावे लागत आहे.




Comments