विधानसभेतशेतकऱ्यांचा युवा आमदार करण देवतळे विधानसभेत गरजले.

भद्रावती येथील निप्पॉन डेंड्रो प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहण झालेल्या शेतकऱ्यांचा  प्रश्न विधानसभेत

शेतकऱ्यांचा युवा आमदार करण देवतळे विधानसभेत गरजले.

वरोरा 
चेतन लूतडे 

एम आय डी सी अंतर्गत निप्पॉन डेंड्रो प्रकल्पासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणासंदर्भात आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी तातडीने  मुख्यमंत्री यांनी  बैठक घ्यावी अशी मागणी विधान सभागृहात वरोरा भद्रावती विधानसभेचे आमदार करण देवतळे यांनी टक्के करण्यात आली.

या प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांवर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी ही बैठक आवश्यक असल्याचे मत यावेळी  आमदार करण देवतळे यांनी विधानसभेत व्यक्त केले.
तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामे मिळावीत अशी सुद्धा सभागृहात मागणी केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. शासन नियमांनुसार कंत्राटी कामांपैकी निश्चित  कामे स्थानिक अभियंत्यांना मिळावीत, यासाठी तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन  विधानसभेत  करण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी विधानसभेतील मागणी 
 सभागृहात वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मागील ५ वर्षांपासून डिमांड भरून सुद्धा वीज मीटर अजून पर्यंत मिळालेले नाही. 
वीज पुरवठ्याच्या पूर्ततेसाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. अद्यापही अनेक शेतकऱ्यांना योग्य वीज पुरवठा मिळालेला नसून, शेतीसाठी आवश्यक वीज वेळेवर उपलब्ध व्हावी यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे सभागृहात  मुद्दा उपस्थित करण्यात आला.

सोलर पंप शेतकऱ्यांना दिले असून त्यावर पुरेशी शेती शेतकऱ्यांना करता येत नाही. काही सोलर खराब झाले असून शेतीला पाणी करता येत नाही. अशा अनेक समस्यांना शेतकरी कंटाळले असून. 
विद्युत विभागाने थ्री फेज लाईन जलसिंचनासाठी उपलब्ध करून द्यावी. सोलर पंप घेतल्यानंतर दहा वर्ष पर्यंत वीज देता येणार नाही. हा निर्णय सुद्धा ज्याचक असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

त्यामुळे आमदार करण देवतळे यांनी शेतकऱ्यांची भावना व्यक्त करत विधानसभेत मांडलेला प्रश्न शेतकऱ्यांच्या आपुलकीचे असल्याने युवा शेतकऱ्याचा आमदार म्हणून जिल्ह्यात ओळखले जात आहे.


*मित्रांनो, सूचना*
      *बियांचे संकलन सुरू झाले आहे*
 *या सामाजिक कार्यास आपले योगदान द्या.*
       पर्यावरण क्षेत्रात छोटेसे योगदान म्हणून आम्ही फळ आणि फुलझाडांच्या बिया संकलित करण्याच्या संकल्प केलेला आहे यास नागरिक व विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे.
        काही नागरिकांनी बिया संकलित करून माझेपर्यंत पोहोचविल्या देखील आहे. श्रीयुत अरविंद जवदंड यांनी मोठ्या प्रमाणात बिया संकलित करून माझेकडे जमा केलेल्या आहेत. 
आपणही या उपक्रमासाठी बिया संकलित केल्या असतील, तर त्या माझेपर्यंत पोहोचविता येत असतील तर पोचवाव्यात किंवा (९२२६१३५२४०) या क्रमांकावर कळवावे.आम्ही त्या घ्यायला येऊ आणि त्याचे वितरण तरुण भारत या वर्तमानपत्रासोबत वाचकांना करण्यात येणार आहे...
*या विधायक सामाजिक कार्याचा आपणही एक हिस्सा बनून या.....*
   घरोघरी, परिसरात यानिमित्याने झाडे लागतील...
*कृपया सहकार्य करावे..*
            श्याम ठेंगडी 
       वरोडा तालुका प्रतिनिधी,
       तरुण भारत

Comments