गांधी चौकात पानठेल्यासमोर सुरू होता सट्टापट्टीचा अड्डा; पोलिसांच्या छाप्यात एक जुगारी ताब्यात, रोख रक्कम जप्त

गांधी चौकात पानठेल्यासमोर सुरू होता सट्टापट्टीचा अड्डा; पोलिसांच्या छाप्यात एक जुगारी ताब्यात, रोख रक्कम जप्त वरोरा, दि. २० एप्रिल २०२६: शहरातील गांधी चौक परिसरात पानठेल्याच्या आडून सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा मारून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका संशयित जुगारीला ताब्यात घेत त्याच्याकडून सट्टापट्टीचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २० एप्रिल रोजी पोलीस हवालदार संदीप विठ्ठल मुळे (बं.नं. २५७१) व त्यांच्या पथकातील अंमलदार मनोज ठाकरे व विशाल राजुरकर हे खाजगी वाहनाने शहरात अवैध जुगार प्रतिबंधासाठी गस्त घालत होते. यादरम्यान पोलिसांना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, मौजा गांधी चौक येथील पानठेल्यासमोर शेख अरबाज नावाचा एक इसम लोकांकडून पैसे घेऊन टाईम बाजार सट्टापट्टी आकड्याचा जुगार खेळवत आहे. माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी दोन स्वतंत्र साक्षीदारांना पंच म्हणून बोलावले. पंचांसह पोलीस पथकाने सदर ठिकाणी धाड टाकली असता, तेथे ...

*चंद्रपूर जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख जाहीर**रवींद्र शिंदे व संदीप गिऱ्हे यांच्याकडे जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभांची जिल्हाप्रमुख पदाची जवाबदारी*

*चंद्रपूर जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख जाहीर*

*रवींद्र शिंदे व संदीप गिऱ्हे यांच्याकडे जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभांची जिल्हाप्रमुख पदाची जवाबदारी*

भद्रावती :
चेतन लूतडे 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख पदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्राद्वारे नियुक्त्यांमध्ये रवींद्र शिंदे यांची वरोरा, भद्रावती, राजुरा आणि चिमूर विधानसभा कार्यक्षेत्राकरीता जिल्हाप्रमुख पदी तर संदीप गिऱ्हे यांची चंद्रपूर, बल्लारपूर आणि ब्रह्मपुरी विधानसभा कार्यक्षेत्राचे जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. पूर्व विदर्भाकडे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे विशेष लक्ष आहे. त्यांनी पूर्व विदर्भातील पदाधिकारी व शिवसैनिकांशी चर्चा करुन स्वतः हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. 

रवींद्र शिंदे हे सहकार व राजकीय क्षेत्रात मागील कित्येक वर्षांपासून कार्यरत होते. त्यांची सहकार क्षेत्रात चांगली पकड आहे. कोरोना काळापासून राजकीय क्षेत्रात ते अधिक सक्रिय झालेले आहेत. या दरम्यान शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने त्यांनी पक्षसंघटन स्तरावर चांगले कार्य केले आहे. जिल्ह्यात पक्षासोबत सदैव प्रामाणिक राहून त्यांनी कार्य केले. त्यांनी सहकारी संस्थेच्या निवडणुका, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका, ग्रामपंचायत निवडणूका यात पक्षाला विजयश्री मिळवून दिली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या निर्णयासोबत राहून वरोरा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी सोबत राहिले. पक्षाकरिता त्यांचे समर्पण व प्रामाणिक भाव याचे फळ म्हणून त्यांना पुन्हा एकदा चिमूरसह वरोरा, राजुरा विधानसभांची जवाबदारी जिल्हाप्रमुख पदाच्या निमित्ताने दिली आहे.

जिल्हाप्रमुख पदाच्या माध्यमातून वंदनीय हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन ८०% समाजकारण व २०% राजकारण या तत्वानुसार समाजकारणावर भर देत पक्षाची धुरा सांभाळणार असल्याचे रवींद्र शिंदे यांनी म्हटले आहे. सोबतच पक्ष संघटनेवर भर देऊन जुन्या व नविन शिवसैनिकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

रवींद्र शिंदे व संदीप गिऱ्हे यांच्या या निवडीकरीता सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Comments