कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांनी भेट दिला चना

कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांनी भेट दिला चना

वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा चना हे पीक 15 दिवसांपूर्वीच बाजारात आलेले आहे. मात्र सरकारच्या नियमानुसार चना या पिकाला हमीभावानुसार भाव मिळत नसल्याची खंत किशोर डुकरे यांनी व्यक्त केली आहे. 

शेतकऱ्यांनी वारंवार निवेदन देऊन सुद्धा हमीभाव मिळत नसल्याने किशोर डुकरे यांनी आंदोलनाचा इशारा देत चना कृषी उत्पन्न कार्यालयात फेकण्यात येईल असा दावा केला होता. यानंतर पोलिसांनी शेतकऱ्याच्या निवेदनाची दखल घेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात चोक बंदोबस्त दिला होता. त्यानुसार सोमवारी शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय गाठून सचिव चंद्रशेखर शिंदे यांना हमीभावानुसार चना खरेदी करण्याची विनंती केली , मात्र सरकारचे कोणतीही असे आदेश नसल्याने सध्या तारण व्यवस्थित शेतकऱ्यांनी चना ठेवावा अशी विनंती केली.  मात्र खाजगी व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात चना खरेदीमध्ये लूट होत असून कमी दराने चना खरेदी होत आहे. यासाठी बाजार समितीने खाजगी व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे अशी सूचना करण्यात आली. सोयाबीन पिकाचे पैसे तीन महिन्यांपासून मिळाले नाही त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत हे पैसे पोहोचवावे अशी निवेदनात मागणी करण्यात आली. 

अशा विविध मागण्यांसाठी किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात चना फेको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त लागला होता.

Comments