डॉक्टर विकास आमटे यांच्या हस्ते पारितोषकाचे वितरण
वरोरा
चेतन लूतडे वरोरा
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा कुष्ठरोग, तालुका आरोग्य अधिकारी, महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'रन फॉर लेप्रसी' कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी करण्यात आले.
कृष्ठरोग प्राचीन काळापासून चालत आलेला आजार आहे तो मुख्यत्वे बॅक्टेरिया पासून होतो. समाजामध्ये आजही फार मोठ्या प्रमाणावर गैरसमजुती आहेत. कुठल्यातरी पाप आपल्या हातून झाले असेल कृष्ट रोगाची लागण झाली असेल . त्यामुळे अंगावरची चट्टे लपवण्याचा प्रयत्न करतो हा बॅक्टेरियामुळे होणारा आजार असल्यामुळे औषध उपचाराने तो 100% बरा करता येतो. आणि लागण होणारा आजार असला तरी खूप जास्त कालावधी लागण होण्यासाठी लागतो. औषध उपचारांनी शंभर टक्के बरा होणारा आजार आहे आणि याची जनजागृती लोकांमध्ये यावी लोकांना कुष्ठरोगांबद्दल, पीडित रुग्णांबद्दल आदर निर्माण व्हावा सन्मान निर्माण व्हावा. आणि कुष्ठरोग हे फक्त विभागामार्फत चालवलेला कार्यक्रम न राहता लोक चळवळ व्हावी लोकांनी समोर येऊन झालेल्या आजाराचे औषधी उपचार करावे. यानिमित्ताने आनंदवन महाविद्यालयाच्या प्रांगणात रन फॉर रेप्रसि हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये सर्व वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग दर्शविला. यामध्ये स्पर्धकांना पारितोषिक डॉक्टर विकास आमटे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात आपल्याकडे 1500 कृष्टरुग्ण आहेत .जे औषध उपचार घेत आहेत आणि या वर्षात साधारणपणे 1955 नवीन रुग्ण शोधलेले आहेत.याच्यात आनंदाची बाब म्हणजे एकाही कृष्ट रुग्णाला कुठली दुष्टीदोष स्वरूपाची विकृती नाही. सगळे रुग्णांना आपण शंभर टक्के औषध उपचार देत आहोत .
Comments
Post a Comment