वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

*राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1340 प्रकरणे यशस्वीपणे निकाली*

*राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1340 प्रकरणे यशस्वीपणे निकाली*

चंद्रपूर,  दि. 22 मार्च : विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा  अभीश्री  देव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली 22 मार्च रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर लोक अदालतीमध्ये प्रलंबीत न्यायालयीन प्रकरणे एकुण 9447  व दाखलपुर्व प्रकरणे 15842 ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबीत न्यायालयीन प्रकरणांपैकी 774 प्रकरणे तर दाखलपुर्व प्रकरणांपैकी 366 अशी एकूण 1340 प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रलंबीत प्रकरणांमध्ये मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे 25 निकाली काढण्यात आली असुन नुकसान भरपाई रक्कम 2 कोटी 19 लाख 55 हजार रूपये वसुल करण्यात आली.  निकाली प्रकरणांपैकी एका प्रकरणात 45 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. तसेच भुसंपादनाची एकुण 6 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात नुकसान भरपाईची रक्कम 42 लाख 17 हजार रूपये मंजुर करण्यात आले. धनादेश प्रकरणांपैकी 125 प्रकरणे निकाली काढण्यात आली. कामगार व औद्योगीक न्यायालयातील एकुण 3 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

चंद्रपूर जिल्हयातील सर्व न्यायालयात लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीश, सर्व वकील, सर्व न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी दिली. 

Comments