प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )*युवासेना तर्फे 11वी व 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी.* *शनिवार, दिनांक 29 मार्च 2025* रोजी विनामूल्य Mock Test परीक्षा.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )
*युवासेना तर्फे  11वी व 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी.*
 *शनिवार, दिनांक 29 मार्च 2025* रोजी  विनामूल्य Mock Test परीक्षा.

वरोरा 
चेतन लूतडे 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे युवा सेना शाखेच्या वतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 29 मार्च 2025 ला मॉक टेस्ट परीक्षा ठेवण्यात आलेली आहे. ही परीक्षा विनामूल्य होत असून अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी पूर्वतयारी ठरणार आहे. 

महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभेतील तालुक्यांमध्ये 1)- NEET - UG*MEDICAL*
2) - MHT - CET 
*ENGINEERING*
3)- MHT - CET 
*PHARMACY*
4)- MHT - CET 
*LAW*  परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा. या करिता  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय“शिवालय” येते  युवासेनेच्या पदाधिकारी पूर्व विदर्भ विभागीय सचिव निलेश बेलखेडे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे, रियाज पटेल विस्तारक, युवा सेना चंद्रपूर जिल्हा माजी जिल्हा प्रमुख तथा गोंदिया जिल्हा विस्तारक मनीष जेठानी चंद्रपूर जिल्हा युवा सेना जिल्हा प्रमुख  विक्रांत सहारे,  चंद्रपूर जिल्हा युवा सेना जिल्हा प्रमुख रोहन कुटेमाटे, उपजिल्हा प्रमुख शरद पुरी, विधानसभा प्रमुख अभिजीत कुडे, विधानसभा समन्वयक निखिल मांडवकर यांचे उपस्थित बैठक पार पडली असून परीक्षा केंद्र लवकरच जाहीर करण्यात येत असून सर्व महाविद्यालय व कोचिंग क्लासेस  यांना भेटी देऊन माहिती द्यावी याचे नियोजन करण्यात आले.सर्व शैक्षणिक संस्थेला माहिती देऊन आपल्या नातेवाईक व मित्रांनासुद्धा या विषयी माहिती द्यावी व 
*विनामूल्य नावनोंदणी साठी खालील संकेतस्थळावर भेट द्यावी-*
https://yuvasenacet.com
*Exam Format Will be Offline.*
असे आव्हान करण्यात आले.यावेळी युवासेना उपतालुका प्रमुख रामानंद वसाके, फैजलं शेख,गजानन पेंदोर,अक्षय मेश्राम,वैभव पुसदेकर युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. 

Comments