प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

*‘कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी’ कार्यक्रम*

*‘कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी’ कार्यक्रम*

 चंद्रपूर, दि. 6 : आम्ही आमच्या आरोग्यासाठी, मिरॅकल फाऊंडेशन इंडिया, जिल्हा महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नियेाजन भवन येथे कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारीत पर्यायी काळजी हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा न्यायाधीश सुमीत जोशी होते.

जिल्हाधिकारी विनय गौडा व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी दीपक बानाईत यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला, आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेचे संस्थापक डॉ. सतीश गोगुलवार, संस्थापिका शुभदा देशमुख, नोडल अधिकारी निशिकांत रामटेके, बाल कल्याण समिती अध्यक्षा क्षमा बासरकर, सदस्या मनिषा नखाते, बाल न्याय मंडळाच्या भावना देशमुख, शासकीय बालगृह निरीक्षण गृह अधीक्षक श्री. सवई, दिवाकर महाकाळकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष सुमीत जोशी म्हणाले, प्रत्येक बालकाला प्रेमळ कुटुंब मिळण्याची आजची गरज आहे. तसेच सृजन पालक कसा घडवायचा, याविषयी तसेच पोक्सो कायद्यातील बाबींवर त्यांनी मार्गदर्शन केले.

प्रत्येक बालकाला एक प्रेमळ कुटुंब मिळावे, या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यात आम्ही आमच्या आरोग्यासाठी, मिरॅकल फाऊंडेशन इंडीया आणि महिला व बालविकास कार्यालयाद्वारे, काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांचे कुटुंब सक्षमीकरण करून कुटुंब आधारित पर्यायी संगोपनामध्ये बालकांना प्रस्थापित करण्यासाठी प्रतिबंधात्मक तसेच गेटकिपींगद्वारे कार्य करीत आहेत.

या कार्यक्रमाचे संचालन प्रकल्प व्यवस्थापक सैदूल टेकाम यांनी तर आभार मयुर राऊत यांनी मानले. यावेळी सर्व कर्मचारी, जिल्हा व रेल्वे चाइल्ड लाईनचे कर्मचारी, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, बालगृह कर्मचारी, बालकांच्या काळजी आणि संरक्षण क्षेत्रात व बाल संगोपन क्षेत्रात काम करीत असलेल्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००००

Comments