कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती वर अविश्वास ठराव दाखल.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती वर अविश्वास ठराव दाखल.

वरोरा 
चेतन लूतडे वरोरा 

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती वारंवार चर्चेचा विषय ठरला आहे. कांदा घोटाळा, तारण घोटाळा यामुळे सभापती वारंवार अडचणीत आले होते. मात्र सत्तेत असलेल्या सदस्यांच्या रोशाला समोर जात सभापती विजय देवतळे यांच्यावर अविश्वास ठराव चंद्रपूर  जिल्हाधिकारी  कार्यालयात दाखल करण्यात आला आहे. 

गुरुवारी सकाळी झालेल्या सभेमध्ये सभापतींच्या विरुद्ध अविश्वास ठराव जाहीर करून. विरोधी गटाने चंद्रपूर येथील कलेक्टर कार्यालयात दाखल करण्यात आला असून . वारंवार झालेल्या घोटाळ्या दरम्यान कोणतेही पाऊल सभापतीने न उचलल्याने सदस्य नाराज झाले होते. यानंतर विषय समित्या मार्फत सदस्यांची नियुक्ती व फेरनियुक्ती झाली नसल्याने कामकाजावर त्याचा परिणाम पडत असलची खंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांनी केली आहे. 
त्यामुळे गुरुवारी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जास्तीत जास्त सदस्यांनी उपस्थित राहून अविश्वास ठराव जिल्हाधिकाऱ्याकडे कडे दिलेला आहे.
याबाबत सचिव चंद्रसन शिंदे यांना याबाबत काहीच माहिती नसल्याचे भ्रमणध्वरीवरून सांगण्यात आले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातून वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीला कार्यालयीन नोटीस बजावण्यात येईल यानंतरच  पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  राजकारणामधील मास्टर स्ट्रोक आघाडी सरकारमधील वरिष्ठ नेत्यांचा असल्याची चर्चा होत आहे. गट रजिस्टर आहेत की नाही. गटातून बाहेर पडता येईल की नाही. असे बरेचसे प्रश्न अजूनही अनुत्तरीत असल्याने धुरंदर राजकारणी या सगळ्या शक्यता तपासून पाहत आहे. अविश्वास ठराव जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यासाठी 12 जणांची आवश्यकता असते. या सगळ्या बाबीं विचारात घेऊन अविश्वास ठराव पारित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.







Comments