स्व. खासदार बाळू धानोरकर स्मृतिप्रित्यर्थ खासदार चषक अखिल भारतीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन
फक्त बातमी
वरोरा दि १९ फेब्रुवारी
विदर्भातील खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात नैपुण्य आहे. त्यांना सोयी सवलती उपलब्ध करून दिल्यास विविध खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण होऊ शकतात. क्रीडा मंत्री असताना मी स्पोर्ट्स विद्यापीठाची स्थापना केली त्यामुळे अनेक दर्जेदार खेळाडू निर्माण होऊ शकल्याचे प्रतिपादन माजी क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी केले. लोकशिक्षण संस्था वरोडा व वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने लोकमान्य महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित स्व. खासदार बाळू धानोरकर स्मृतिपित्यर्थ खासदार चषक अखिल भारतीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी खा प्रतिभा धानोरकर, रामटेक चे खासदार श्यामकुमार बर्वे, लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमुक्का, उपविभागीय अधिकारी झेनीत चंद्रा, उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम, माजी नगराध्यक्ष आहतेश्याम अली, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णरेखा पाटील, इंनर व्हील च्या अध्यक्ष दिपाली माटे, रोटरी चे अध्यक्ष बंडू देऊळकर, आनंद गुंडावार आणि मानस धानोरकर उपस्थित होते
या प्रसंगी बोलताना खासदार बर्वे यांनी स्पर्धेच्या आयोजनाची प्रशंसा केली. यामुळे ग्रामीण भागात व्हॉलीबॉल खेळाला चालना मिळून उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू तयार होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वर्गीय बाळू धानोरकर यांच्या आठवणींना उजाळा देत अखिल भारतीय कबड्डी आणि व्हॉलीबॉल या खेळांचे आयोजन म्हणजे वरोरा शहराच्या शिरपेचात तुरा असल्याचे त्या म्हणाल्या. यामुळे ग्रामीण भागात हे खेळ पुन्हा नव्या जोमाने खेळले जात असून उत्तम खेळाडू निर्माण होत आहेत असेही त्या म्हणाल्या. प्रा. श्रीकांत पाटील यांनी वरोरा हे शहर व्हॉलीबॉल खेळाचे पंढरी असल्याचे सांगत आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू या ठिकाणाहून तयार झाल्याचे दाखले त्यांनी दिले. पोलीस अधीक्षक सुदर्शन व मुमुक्का यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनाच्या व्हॉलीबॉल खेळाच्या आठवणी आणि अनुभव सांगितले. परिश्रम केल्याने यश मिळतं असे सांगत खेळाडूंनी दर्जेदार खेळाकरिता परिश्रम करावे असे ते म्हणाले.
झेनित चंद्रा, नयोमी साटम, आहतेश्याम अली, सुवर्णरेखा पाटील, मानस धानोरकर यांनीही आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. सुरुवातीला लोकशिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष स्वर्गीय श्रीकृष्ण घड्याळपाटील आणि स्वर्गीय सुरेश काकडे यांना श्रद्धांजली बाबा वाहण्यात आली. क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल अविनाश नेवास्कर, सुनील बांगडे यांचेसह वैभव साळवे, लोकेश मिलमिले, प्रशिल हजारे आणि अनिकेत चौधरी आणि आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल पटू, साजिया शेख या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
एस.ए. योगा इन्स्टिट्यूटच्या योगपटूंनी याप्रसंगी वेधक योग नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन चे अध्यक्ष गजानन जीवतोडे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. प्रशांत खुळे यांनी केले. संपूर्ण देशातून आलेल्या विविध संघांचा खेळ बघण्याकरिता क्रीडा प्रेमींची मोठी उपस्थिती याप्रसंगी होती.
Comments
Post a Comment