वरोरा येथे सेवानिवृत्त शिक्षकाला तीन अज्ञात तरुणांनी मारहाण; तोंडाला व डोळ्याला गंभीर दुखापत

वरोरा येथे सेवानिवृत्त शिक्षकाला तीन अज्ञात तरुणांनी मारहाण; तोंडाला व डोळ्याला गंभीर दुखापत वरोरा (जि. चंद्रपूर) – येथील कृष्ण नगरी परिसरात योग वर्गासाठी जात असताना एका सेवानिवृत्त शिक्षकाला तीन अज्ञात तरुणांनी अडवून त्यांची बेदम मारहाण केली. या घटनेत शिक्षकांचे तोंड फुटून रक्तस्त्राव झाला असून डाव्या डोळ्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. विलास दशरथ हजारे (वय 61, सेवानिवृत्त शिक्षक, रा. कृष्ण नगरी, वरखडे लेआउट, टिळक वार्ड, वरोरा) हे पतंजली योग संस्थेचे निःशुल्क योग वर्ग घेतात. दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी साधारणतः 5.15 वाजता ते योग वर्गासाठी घरून पायी निघाले. कृष्ण नगरी बोर्डाजवळ हायवेवर आल्यावर त्यांच्या लक्षात आले की, एका दुचाकी मोपेडवर तीन अनोळखी इसम उभे होते. त्यांनी लाल रंगाचे टी-शर्ट परिधान केले होते, तोंडाला कापड बांधले होते, तिघेही सडपातळ बांध्याचे असून वय अंदाजे 22 ते 25 वर्षे होते. विलास हजारे यांना आशीर्वाद लेआउटच्या बोर्डाजवळ जाऊ देऊन तिघेजणही मोपेडने त्यांच्या मागून आले व त्यांची दुचाकी समोर आडवी करून त्यांना अडविले. त्यानंतर त्यांनी शिक्षकांना उद...

*महाराष्ट्र आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेचा आजपासून बेमुदत संप*

*महाराष्ट्र आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेचा आजपासून बेमुदत संप* 
वरोडा :- शाम ठेंगडी 

       एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाचे कार्यरत आरोग्यमित्र यांचे आज  18 फरवरीपासून राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले आहेत. या या आंदोलनात वरोरा येथील आरोग्यमित्रही सहभागी झाल्याने येथील कामकाज ठप्प झाले आहे.
     राज्य आरोग्य हमी सोसायटी  व सहाय्य संस्था यांनी आरोग्यमित्राच्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेऊन आरोग्यमित्रांना न्याय द्यावे अशी विनंती पूर्वक निवेदन आरोग्यमित्रांकडून देण्यात आले आहेत. यावर योग्य निर्णय घेण्यात आले नाही. आरोग्यमित्र हे पदविधर असून, योजनेचे योग्य कौशल्य असलेले तसेच रुग्णाचे योग्य समुपदेश करणे. हे सर्व काम आरोग्यमित्र करीत असतो. त्यामुळे दिनांक 23 ऑगस्ट 24 ला जीवनदायी भवन मुंबई येथे झालेल्या बैठकीत  सीईओ सर यांनी आश्वासन दिले होते .परंतु त्यावर काही निर्णय घेण्यात आले नाही.यासाठी आरोग्यमित्र संघटनेकडून पत्रव्यवहार करण्यात आले.परंतु त्यावर राज्य आरोग्य हमी सोसायटी व सहाय्य संस्था यांनी काहीच निर्णय घेतले नाही. त्यामुळे 12 फरवरी 25 ला संघटनेकडून संपाची घोषणा  करण्यात आली होती. 
      यानंतर राज्य आरोग्य हमी सोसायटी व सहाय्य संस्था  7 फरवरी 2025 ला जीवनदायी भवन मुंबई येथे बैठक झाली. त्यात  10 दिवसाची वेळ मागण्यात आली. ती सुद्धा संघटनेकडून देण्यात आली. पण त्यावर १७ फरवरीपर्यंत निर्णय घेण्याची मुदत देण्यात आली.परंतु त्यावर योग्य निर्णय न झाल्याने शेवटी आज  18 फरवरी 25 पासून महाराष्ट्र आरोग्यमित्र संघटनेकडून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.
     चंद्रपूर आरोग्यमित्र संघटने कडून सुद्धा चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर संप करण्यात येत आहे. संपाला  सिटूच्या चंद्रपूर जिल्हा संघटनेचे सदस्य कॉ. किशोर जामदार , कॉ. राजेश पिंजरकर , कॉ. अरुण भेलके यांनी मार्गदर्शन केले. तसेच  आरोग्यमित्र संघटनेकडून जिल्हाधिकारी विनय गौडा   यांना निवेदन देण्यात आले. 
तरी आरोग्यमित्र यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात तोपर्यंत हे संप मागे घेणार नाही असे  संघटनेचे अध्यक्ष कॉ. डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले

 .

Comments