११ गुन्ह्यांत १२ आरोपींना अटक चार लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त.
वरोरा (चंद्रपूर) : शहरात विविध ठिकाणी सट्टापट्टीचा व्यवसाय सुरू आहे. शनिवारी पोलिसांनी ११ ठिकाणी धाड टाकून १२ जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करून चार लाख २२ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यात अवैधरीत्या सुरू असलेल्या जुगार, सट्टापट्टी व अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे न आदेश स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना दिले. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक महेश न कोंडावार यांच्या मार्गदर्शनात पोलीस वे असताना जुगार व सट्टापट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणी छापा
टाकून सट्टापट्टी चालविणाऱ्या १२ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर वरोरा पोलीस स्टेशन येथे ११ गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपींकडून रोख २२ हजार ८२० रुपये व ८ दुचाकी किंमत चार लाख असा एकूण चार लाख २२ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना पुढील तपासकामी वरोरा पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, मधुकर सामलवार, संतोष निंभोरकर, सुनील गौरकार यांनी केली.
---------------------------------------
जाहिरातीसाठी संपर्क
9579734429
Comments
Post a Comment