कृषी पंपासाठी मागेल त्याला सोलर शेतकऱ्यासाठी ठरवता डोकेदुखी

कृषी पंपासाठी मागेल त्याला सोलर शेतकऱ्यासाठी ठरवता डोकेदुखी 

वरोरा

 सन 2021 नंतर शेतकर्यांनी कृषी पंपासाठी अर्ज दाखल केले होते त्या सर्व शेतकर्याना कृषी पंप विज जोडणी झाली आहे .
सन २०२१ नंतर कृषी पंप विज जोडणीसाठी अर्ज केलेले तालुक्यातील जवळपास ७०० शेतकरी अजुनही विज जोडणीचा प्रतीक्षेत आहे. तसेच केंद्र व राज्यसरकार यांचा अधीसूचने नुसार सर्व शेतकऱ्याना सोलर घेण्याचा सूचना दिल्या आहेत.
आता शेतकरीर्यानी विज जोडणी साठी अर्ज केला असता सर्व शासनाच्या ऑनलाईन साईड बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्या नवीन विज जोडणी परवाना मिळणे बंद झाले आहे . आज पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कृषी पंपसाठी जे काही डिमांड भरले होते, त्याच्या वर वाढीव शुल्क आकारून त्याच परवान्यावर सोलर चे डिमांड भरून मागेल त्याला सोलर या योजनेत शेतकऱ्यांना सोलर देण्यात यावे असे राज्य सरकारचा आदेश आहे. तसेच काही शेतकरी स्वतः पैसे लावून आपल्या शेतात विज घेत होते,या योजनेमुळे काही शेतकरी यांना तात्काळ विज मिळत होती मात्र ही योजना सरकार ने बंद पाडली आहे .
त्यामुळे शेतकर्यांना आता सोलर घेतल्या शिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही.सोलर ही योजना नैसर्गिक आपत्ती तसेच बिघडा मुळे शेतकरी यांना डोके दुःखी ठरत असून परिसरातील शेतकरी बंद पडलेली विज जोडणी योजना सुरु करून शेतकर्यांना विज देण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी नेते  किशोर डुकरे तसेच शेतकरी करीत  आहे.


Comments