मंगळवार दिनांक 14 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता भद्रावती तालुक्यातील पारोधी या गावी उंबर घाट नाल्यातील अवैद्य रेतीचे ट्रॅक्टर नाल्यातून रेती उपसा करत असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळताच गौण खनिज शोध पथक यांनी उंबरघाट येथे धडक दिली त्यावेळी नाल्यात तीन ट्रॅक्टर होते .दोन ट्रॅक्टर रेती तस्कर पळविण्यात यशस्वी झाले. एक ट्रॅक्टर रेती भरलेलेनाल्यात फसल्याने त्याला पकडण्यात आले व गावातील ट्रॅक्टरच्या सहाय्याने गावकऱ्यांच्या मदतीने अवैध रेती भरलेले ट्रॅक्टर कारवाईसाठी काढण्यात आले.
एक ब्रास रेती ची कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वात गौण खनिज शोधपथक मंडळ अधिकारी समीर वाटेकर,तलाठी, अनिल दडमल, तलाठी खुशाल मस्के, तलाठी भिसीकर यांनीअवैद्य रेतीची विचारपूस केली असता, सदर हे वाहन मालक मारुती गायकवाड यांचे मालकीचे असून राहणार वायगाव(कुरेकार )यांचे असून अवैद्यरित्या वाहतूक करणाऱ्या रेती भरलेले ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले होते.
यामध्ये गावातील सात जणांचा पंचनामा तयार करून 154 ब्रास वाळू उत्खनन केल्याचे निदर्शनास आले होते.
यानंतर विभागातर्फे नदीपात्रातील अवैध रेती उत्खनांचे तांत्रिक तपासणी करून अहवाल सादर करण्यात आला.
यानंतर काय झाले...
Comments
Post a Comment