*भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील घटना*
फक्त बातमी
भद्रावती तालुक्यातील चंन्दनखेडा येथील मुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 24 ला उघडकीस आली. अरोहन माणिक बागेसर,वय 16 वर्ष, राहणार चंदनखेडा असे या मृतक मुलाचे नाव असून शुल्लक कारणावरून रागावून मृतक अरोहण हा दिनांक 22 ला घरून निघून गेला होता. घरच्या लोकांनी दिनांक 23 ला तो बेपत्ता असल्याची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल केली. मात्र 24 ला दुपारी 12.30 वाजता त्याचा मृतदेह गावातील सरकारी दवाखान्या जवळील हनुमान मंदिर परिसरातील विहिरीत आढळून आले. ही घटना कळतात भद्रावती पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे.
Comments
Post a Comment