तहसील प्रांगणातून पळवलेले हायवा शोधण्यात पोलिसांना यश *अमरावती मधून घेतले ताब्यात*रेतीच्या अवैध वाहतुक संदर्भात झाली होती कारवाई
*अमरावती मधून घेतले ताब्यात
रात्री ट्रक पळवण्यास वरोरा येथील वाळू माफियाशी संबंधित व्यक्तींचे सहकार्य असल्याचा संशय
फक्त बातमी
वरोरा (चंद्रपूर): विनापरवाना रेतीची वाहतूक करताना पकडून तहसील कार्यालयात जमा केलेले दोन हायवा ट्रक त्याच दिवशी अज्ञातांनी पळवले होते. या संदर्भातील दि.२२ जानेवारी रोजी च्या पोलीस तक्रारीनंतर गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगाने तपास करून अमरावती येथून दोन्ही हायवा ट्रक आज शुक्रवार दि.२४ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास ताब्यात घेतले आहे.
अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी वरोरा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार उल्हास लोखंडे २१ जानेवारी रोजी रात्री च्या सुमारास वरोरा तालुक्यातील शेगाव(बु ) परिसरात वाहनांची तपासणी होते . दरम्यान बस स्थानकाजवळ एम. एच. २७ बीएक्स ४७०० ) व एम एच ४० सीटी १८०४ या दोन ट्रेलर वजा हायवा ट्रकला थांबवून पाहणी केली असता त्यांना दोन्ही वाहनात रेती आढळून आले. तेव्हा त्यांनी वाहन चालक शेख रशीद शेख हबीब आणि कलीन दुर्गलिम शेख हनीफ अशा दोघांनाही रेती वाहतुकीचा परवाना मागितला असता त्यांच्याकडे तो नव्हता. त्यामुळे रेती भरलेले दोन्ही हायवा ट्रकवर शेगाव (बु) पोलिसांच्या मदतीने वरोरा तहसील कार्यालयाच्या परिसरात आणून बुधवार दि. २२ जानेवारीच्या पहाटे जप्तीची कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर नायब तहसीलदार लोखंडे हे शेगाव येथे पोलिसांना सोडायला जाऊन पहाटे पाच वाजताच्या सुमारास वरोरा तहसील कार्यालयात परत आले असता त्यांना जप्त केलेले दोन्ही हायवा ट्रक गायब दिसले.
यानंतर त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती तहसीलदारांना दिली. आणि तहसीलदारांनी दिलेल्या निर्देशानंतर नायब तहसीलदार उल्हास लोखंडे यांनी यासंदर्भात दि.२२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पोलीस तक्रार दिली. सदर तक्रारीत तहसील कार्यालयाच्या प्रांगणातून जप्त केलेले दोन हायवा ट्रक आणि रेतीसाठा असा १ कोटी २३ लाख ७४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रारीवरून रात्री ८ वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही हायवा ट्रक तहसील कार्यालयातून पळवून नेतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असल्याने त्या आधारे वरोरा पोलीसांनी वेगाने तपास सुरू केला. वाहनांचा शोध घेण्यासाठी एक पथक वर्धा व नंतर अमरावती येथे पाठविण्यात आले. आज शुक्रवार दि.२४ जानेवारी रोजी या पथकाला पळवून नेलेले दोन्ही ट्रेलर वजा हायवा ट्रक शोधण्यात यश आले. सायंकाळच्या सुमारास अमरावती मधून सदर वाहने ताब्यात घेऊन वरोरा पोलीस स्टेशनमध्ये आणले जात आहे. यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जाते. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या निर्देशानुसार गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक दीपक ठाकरे ,पोलीस उपनिरीक्षक अक्षय पवार ,पोलीस हवालदार अमोल नवघरे ,शिपाई संदीप मुळे, विशाल राजूरकर यांच्या पथकाने केली.
हायवा पळवण्यास मदत करणाऱ्याचा उलगडा होणार
दि.२२ जानेवारी रोजी पहाटे अडीच वाजता दोन्ही हायवा ट्रकवर जप्तीची कारवाई केल्यानंतर पहाटे साडेपाचच्या सुमारास सदर दोन्ही हायवा ट्रक तहसील कार्यालयाच्या प्रमाणातून पळविण्यात आले होते. हा प्रकार महसूल विभागाच्या एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या नव्हे तर वरोरा शहरातील एखाद्या व्यक्तीच्या मदतीशिवाय होणे अशक्य आहे. यामुळे सदर कालावधीमधील तहसील कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल टावर लोकेशन तपासून ट्रक पळविण्यास मदत करणाऱ्या मास्टर माईंडचा शोध घेतला जाणार असल्याचे म्हटले जाते.
हा सगळा प्रकार नायब तहसीलदार लोखंडे व त्यांच्या सहकार्यासमोर झाला असून रात्रीच्या सुमारास वरोऱ्यातील एका व्यक्तीने संपर्क साधून हितसंबंध जपण्याचा प्रयत्न केला.
परंतु तो असफल ठरल्याने व रात्रीची संधी पाहून हे प्रकरण कोणालाच कळणार नाही अशी शंका व्यक्त करत. अमरावती येथील ट्रक वाळू माफियातील संपर्क असणाऱ्या त्या व्यक्तीकडून बिनधास्तपणे पळविण्यात आल्याची शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत सोशल मीडियावर भरपूर चर्चा होत असून त्या व्यक्तीचे नाव शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी करायला हवा.
Happy birthday narendra nemade
Comments
Post a Comment