मामा मेलचा थरार! चंद्रपूर-मूल महामार्गावर भर दिवसा गायीची शिकार ओढत नेली, व्हिडीओ वायरल"

"मामा मेलचा थरार! चंद्रपूर-मूल महामार्गावर भर दिवसा गायीची शिकार ओढत नेली, व्हिडीओ वायरल" चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर-मूल महामार्गावर प्रसिद्ध 'मामा मेल' या वाघाच्या शिकारीचा थरार पाहायला मिळाला. भर दिवसा या वाघाने महामार्गावरून एका गायीची शिकार ओढत नेली. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी हा धक्कादायक प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. सध्या हे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहेत. 'मामा मेल' या वाघाचा अधिवास मूल-चंद्रपूर महामार्गावरील मामला परिसरात आहे. काल आगडी भागात महामार्गाच्या बाजूला त्याने गायीची शिकार केली आणि तिच्यावर ताव मारला. त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनी तेथे गर्दी केल्याने 'मामा मेल'ने आपली शिकार महामार्ग ओलांडून जंगलाच्या आत नेली. या थरारक शिकारीचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

पंचनामा 154 ब्रासचा कारवाई एका ब्रास वर चंदनखेडा परिसरातील गायकवाड यांच्या ट्रॅक्टर वरील कारवाई

पंचनामा 154 ब्रासचा कारवाई एका ब्रास वर 

चंदनखेडा परिसरातील गायकवाड यांच्या ट्रॅक्टर वरील कारवाई

वरोरा 
चेतन लूतडे 

मंगळवार दिनांक 14 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता भद्रावती तालुक्यातील पारोधी या गावी उंबर घाट नाल्यातील अवैद्य रेतीचे ट्रॅक्टर नाल्यातून रेती उपसा करत असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळताच  गौण खनिज शोध पथक यांनी उंबरघाट येथे धडक दिली. त्यावेळी नाल्यात तीन ट्रॅक्टर होते .दोन ट्रॅक्टर रेती तस्कर पळविण्यात यशस्वी झाले. एक ट्रॅक्टर रेती भरलेले नाल्यात फसल्याने त्याला पकडण्यात आले. यानंतर गावातील ट्रॅक्टरच्या सहाय्याने व गावकऱ्यांच्या मदतीने अवैध रेती भरलेले ट्रॅक्टर भद्रावती महसूल विभागाने कारवाईसाठी काढण्यात आले. यावी पंचायत समक्ष या ठिकाणी गड्याचे मोजमाप करण्यात आले होते.

यानंतर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर एक ब्रास रेती ची कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वात गौण खनिज शोधपथक मंडळ अधिकारी समीर वाटेकर,तलाठी, अनिल दडमल, तलाठी खुशाल मस्के, तलाठी भिसीकर यांनी केली होती. अवैद्य  रेतीच्या वाहनाची विचारपूस केली असता सदर हे वाहन मालक मारुती गायकवाड यांचे मालकीचे असल्याचे कळले. सदर वाहन अवैद्यरित्या रेती वाहतूक करत असल्याने ताब्यात घेण्यात आले होते.

यामध्ये उत्खनन केलेल्या वाळूच्या जागेचे मोजमाप करुन पंचनामा तयार करून  एकूण 154 ब्रास वाळू उत्खनन केल्याचे निदर्शनास आले होते. तेंव्हा गावातील 7 पंचाच्या सह्यानिशी पंचनामा करण्यात आला असून परोधी नदीपात्रातील उत्खननाचे मोजमाप करण्यासाठी  तहसिलदार भद्रावती यांनी उपविभागीय अभियंता सा बा विभाग यांना नदीपात्रातील उत्खननाचे मोजमाप करुण अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आता यानंतर सदर उत्खनन करणाऱ्या वाळू तस्करांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार काय असा असावा जनतेतर्फे विचारल्या जात आहे.


Comments