वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

नायलॉन मांजाची विक्री भोवणारमनपा भरारी पथकांची नजरकडक कारवाईचे मनपा आयुक्तांचे निर्देश

नायलॉन मांजाची विक्री भोवणार
मनपा भरारी पथकांची नजर
कडक कारवाईचे मनपा आयुक्तांचे निर्देश

अकूंश अवथे 

चंद्रपूर १६ डिसेंबर -  राष्ट्रीय हरित लवादाने पतंगबाजी करत असताना नायलॉन धागा वापरण्यास बंदी घातली आहे. तरीही शहरातील पतंगबाजी करणारे काहीजण नायलॉन मांजाच्या शोधात असतात.त्यामुळे पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग व विक्री आणि आयात करणारे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.
      मनपा भरारी पथकांद्वारे नियमित पतंग,मांजा विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत असुन दर दिवसाच्या कारवाईचा अहवाल आयुक्तांद्वारे मागविण्यात येत आहे. दरवर्षी तीळ संक्रांतीच्या उत्सवाला पतंग उडविण्याची परंपरा आहे. त्यासाठी महिनाभर आधीपासूनच पतंग आणि दोरा यांची विक्री सुरु होते. नायलॉन धागा वापरण्यास बंदी असतांना शहरात हा धागा वापरला जात असल्याचे आढळुन येते. याच्या वापराने पशु - पक्षी तसेच नागरिकांना सुद्धा गंभीर इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत.  
      महापालिकेचे उपद्रव शोधपथक यावर कारवाई करत असुन नायलॉन मांजा बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मनपाच्या माध्यमातून विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. बंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर विक्री केल्यास १० हजारांचा दंड आणि साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई आणि साहित्य जप्त केले जाणार आहे. त्यामुळे कुणीही नायलॉन मांजाची विक्री करू नये व नागरीकांनी सुद्धा या मांजाचा वापर करू नये असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Comments