कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा

कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा. जनावरांची अवैध वाहतूक उधळली, १९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त बातमी:chetan lutade,warora/2/5/26 वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा पोलीसांनी नाईट गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत ३० गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उधळून लावली असून सुमारे १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून इतर साथीदार पसार झाले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ मे रोजी पहाटे ४.३५ वाजताच्या सुमारास वणी-चंद्रपूर मार्गावरील शेंबळ नाका परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी नागपूरकडून येणारा आयशर कंटेनर (क्र. HR 55 T 4329) संशयास्पदरीत्या येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर ट्रकमधील दोन इसम उडी मारून झुडपात पळून गेले, तर चालकाला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, ट्रकच्या मागील भागात ३० गोवंशीय बैल अत्यंत दाटीवाटीने, कोणतीही चारा-पाणी व्यवस्था न करता बांधून ठेवलेले आढळले. तसेच वाहतुकीसाठी आवश्यक परवाने व कागदपत्रे नसल्याचेही स्पष्ट झाले. ...

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध, चंद्रपूर शहरात काढण्यात आली एकता रॅली

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध, चंद्रपूर शहरात काढण्यात आली एकता रॅली

अकूंश अवथे चंद्रपूर 

बांगलादेशातील हिंदू समाजावर मागील अनेक महिन्यापासून अत्याचार सुरु आहे . ज्यात हल्ले, हत्या, लुटमार, जाळपोळ आणि महिलांचा अमानुष छळ, हिंदू आणि अल्पसंख्यांकांच्या धर्मिक स्थळांची विटंबणा सुरु केली  आहे. या घटनेचा   विरोध करण्यासाठी आज सोमवारी चंद्रपूर शहरात बंगाली समाज एकता संघर्ष समितीचा वतीने एकता रॅली काढण्यात आली . हि एकता रॅली  बंगाली कॅम्प  दुर्गा माता मंदिर  येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली . या एकता रॅलीत  बंगाली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी  विनय गौडा  यांना बंगाली समाज एकता संघर्ष समितीचा वतीने  निवेदन देण्यात  आले.



Comments