वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

पिक विम्याचे पैसे तात्काळ द्या- खासदार प्रतिभा धानोरकरहिवाळी अधिवेशन 2024

पिक विम्याचे पैसे तात्काळ द्या- खासदार प्रतिभा धानोरकर
हिवाळी अधिवेशन 2024

फक्त बातमी 

दिल्ली येथे लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असून विविध प्रश्नांच्या माध्यमातून खासदार प्रतिभा धानोरकर ह्या सरकार चे लक्ष वेधून घेत आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान सन 2023 ची प्रधानमंत्री पिक विम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचे सरकार च्या लक्षात आणून दिले.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्ली येथे लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात विविध विषयाच्या अनुषंगाने सरकार ला धारेवर धरले असून कृषी व शेतकरी विषयाच्या संदर्भात त्यांनी आक्रमकपणे आपले प्रश्न मांडले आहेत. किटकनाशकांमुळे अनेक शेतकऱ्यांचे व त्यांच्या पाल्यांचे मृत्यु होत असल्याचे सरकार च्या निर्दशनास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आणून दिले. तसेच किटकनाशकामुळे होणारे दुष्परीणामांसाठी सरकार ने उपाययोजना कराव्यात. त्यासोबतच अशा प्रकरणात दवाखान्यांना देखील आवश्यक सूचना द्याव्यात या संदर्भात खासदार धानोरकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यासोबतच 2023 मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पिक विम्याचे पैसे अद्यापही मिळाले नसल्याचे सभागृहात खासदार धानोरकर यांनी सांगितले. संबंधीत पिक विम्याचे पैसे तात्काळ देण्यात यावे व संबंधीत कंपनीवर कार्यवाही करावी अशी मागणी देखील खासदार धानोरकर यांनी सभागृहात केली. संबंधीत कंपनीची मुजोरी या सरकार ने बंद करावी व शेतकाऱ्यांना न्याय द्याव, अशी देखील विनंती सरकार कडे केली.

Comments