*विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या ३६ खातेदाराचे १ कोटी ७ लाख केले गहाळ**बँकेच्या अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हे दाखल**शाखा व्यवस्थापकाची भद्रावती पोलिसात तक्रार*
*बँकेच्या अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हे दाखल*
*शाखा व्यवस्थापकाची भद्रावती पोलिसात तक्रार*
अतुल कोल्हे भद्रावती -
विदर्भ कोकण ग्रामिण बँक शाखा भद्रावतीच्या ३६ खातेदाराच्या खात्यातील रक्कम येथील कार्यरत अधिकाऱ्याने परस्पर आपल्या इतर खात्यात वळते करून खातेदाराची १ कोटी ७ लाख रक्कम गहाळ केल्याचा प्रकार घडला हा प्रकार येथील बँकेचे शाखा व्यवस्थापक यांच्या लक्षात येताच त्यांनी या घटनेची तक्रार ३१ ऑक्टोबरला भद्रावती पोलिसात दाखल केली चौकशीनंतर यातील तीन आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे .
यातील रजत बाबुराव ईटनकर अधिकारी विदर्भ कोकण ग्रामीण बँक , सुरज कुमार साहू राहणार नागपूर, प्रदीप दत्तात्रेय दूधभाते राहणार पुणे असे आरोपीचे नाव आहे. अमोल प्रकाशराव कठाळे शाखा व्यवस्थापक विदर्भ कोकण ग्रामीण बँक असे फिर्यादीचे नाव आहे. शाखा व्यवस्थापक अमोल यांचा १ सप्टेंबर रोजी अपघात झाल्याने ते दीड महिना गैरहजर होते. त्या काळात बँकेचे मुख्य अधिकारी म्हणून रजत ईटणकर यांना भद्रावती बँकेची जबाबदारी दिली होती. पार्वताबाई काकडे या खातेदाराच्या खात्यातून ३ लाख ५० हजार काढल्याची तक्रार बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्त झाली त्यानंतर या प्रकाराबाबत चौकशी केली असता रजत याने शेगाव ब्रांच मध्ये कार्यरत असताना तिथूनच गहाळ केले होते या घटनेची तक्रार शेगाव पोलीस स्टेशन येथे सुद्धा दाखल झाली आहे. बँकेचे अधिकारी रजत ईटणकर यांच्यावर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संशय आल्याने भद्रावती शाखेच्या इतर खातेदाराच्या खात्याची तपासणी केली असता ऑगस्ट २०२४ ते ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण ३६ खातेदाराच्या खात्यातून १ कोटी ७ लाख गहाळ झाल्याचे उघडकीस आले व ही रक्कम रजत ईटणकर याने आपल्या बँकेचे अधिकारी असलेले दोन मित्र यांच्या संगनमताने आरटीजीएस ,नेफ्ट व रोख द्वारे गहाळ केले हा सर्व प्रकार लक्षात येतात बँकेच्या शाखा व्यवस्थापक यांनी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली असता चौकशी नंतर यातील तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आह.
[या पद्धतीने केली खात्यातील रक्कम वळती ]
बँकेतून ऑनलाइन किंवा रोख रक्कम एका खात्यातून दुसऱ्या खात्यात टाकायचे असेल तर एक अधिकारी एन्ट्री करणारा लागतो व दुसरा अधिकारी व्हेरिफाय करतो जोपर्यंत ही प्रोसिजर होत नाही तोपर्यंत एका खात्यातून दुसऱ्या खात्यात रक्कम जात नाही. रजत ईटनकर याला सुरत साहू व प्रदीप दूधभाते हे बँकेचे अधिकारी व्हेरिफाय करत असल्याने यांच्या संगनमतातून ही रक्कम गहाळ झाली.
[अमोल कठाळे शाखा व्यवस्थापक विदर्भ कोकण ग्रामीण बँक ]
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या ३६ खातेदाराचे १ कोटी ७ लाख गहाळ झाल्याचा प्रकार घडला मात्र खातेदारांनी घाबरण्याचे कारण नाही काही खातेदाराची ठेवी जमा करण्यात आली आहे व बाकींची लवकरच जमा होणार आहे.
अमोल काचोरे ठाणेदार भद्रावती - खातेदाराचे १ कोटी ७ लाख गहाळ झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी तीन व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Comments
Post a Comment