निवडणूक आयोगाने घेतला जिल्हानिहाय पूर्वतयारीचा आढावा**Ø छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिका-यांची उपस्थिती**Ø ऑनलाईन पध्दतीने निवडणूक निरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित*
*Ø छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिका-यांची उपस्थिती*
*Ø ऑनलाईन पध्दतीने निवडणूक निरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित*
चंद्रपूर, दि. 6 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या पुर्वतयारीचा जिल्हानिहाय आढावा आज (दि. 6) छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगाचे उपआयुक्त हिर्देश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातील प्रत्येक जिल्ह्याचा यावेळी आढावा घेण्यात आला. या बैठकीस राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, अति.मुख्य निवडणूक अधिकारी बी. प्रदीपकुमार यांच्यासह चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आदी उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रिया राबवितांना त्यात कोणत्याही शंकेला वाव असता कामा नये, याची खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिर्देशकुमार यांनी निवडणूक यंत्रणांना दिले.
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्य प्रणालीद्वारे सामान्य निवडणूक निरीक्षक संजयकुमार, आर. मुत्यालाराजु रेवु, संगिता सिंग, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक अवधेश पाठक, खर्च पथक निवडणूक निरीक्षक आदित्य बी. आणि धमेंद्र सिंह यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र माने (70-राजुरा), संजय पवार (71-चंद्रपूर), अजय चरडे (72- बल्लारपूर), पर्वणी पाटील (73-ब्रम्हपुरी), किशोर घाडगे (74- चिमूर) आणि दोन्तुला जेनित चंद्रा (75-वरोरा), उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते.
यावेळी चंद्रपूर जिल्ह्याची संक्षिप्त माहिती, विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या (स्त्री, पुरुष व इतर), मतदान केंद्रांची माहिती, मतदान केंद्रावर पुरविण्यात येणा-या किमान मुलभूत सुविधा, सहाही मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार, जिल्ह्यात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची उपलब्धता, निवडणुकीसाठी उपलब्ध असलेले मनुष्यबळ, त्यांचे प्रशिक्षण, वाहतूक व्यवस्था आराखडा, वाहनांची उपलब्धता, विधानसभानिहाय करण्यात येणारे वेबकास्टींग, कायदा व सुव्यवस्था आदीबाबत माहिती देण्यात आली.
००००००
Comments
Post a Comment