अतुल कोल्हे भद्रावती :-
तालुक्यातील माजरी येथील शिरना नदी घाटावर उगवत्या सूर्यास अर्ध्य वाहून माजरी येथे छटपूजा उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. चार दिवस चाललेल्या या उत्सवात महिलांव्दारे करण्यात आलेले व्रत व उपवास सांगता दिनी सोडण्यात आले.तालुक्यातील माजरी येथे उत्तर भारतीय नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याने येथे छटपूजा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.छटपूजेच्या सांगता दिवशी शेकडो महिलांनी येथील शिरना नदीवर सकाळी सूर्याला अर्ध्य देण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे शिरना नदी घाट भाविकांनी फुलून गेला होता. उत्सवाच्या पहिल्या दिवशी नहाय खाऊन उत्सवाची सुरुवात करण्यात आली व शिरना नदीत पवित्र स्नान करण्यात आले. या काळात महिलांनी व्रत व उपवास ठेवला. तिसऱ्या दिवशी नरजला व्रत पाळण्यात आले व सूर्याला सूर्यास्ताचे वेळी अर्ध्य वाहण्यात आले. तर चौथ्या दिवशी सकाळी सहा वाजता उगवत्या सूर्याला अर्ध्य वाहून उत्सवाची मोठ्या ऊत्साहात सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment