*गोंडवाना गणतंत्र पक्षाचे रमेश मेश्राम यांच्या उमेदवारी अर्ज अपात्रतेमुळे राजकीय समीकरण बिघडले*रमेश मेश्राम गेम चेंजर ठरतील.
रमेश मेश्राम गेम चेंजर ठरतील.
वरोरा 3/11/2024
चेतन लुतडे
मागील 2019मधील निवडणुकीमध्ये सहा हजाराच्या वर मतदान घेतलेले गोंडवाना गणतंत्र पक्षाचे झुंजार नेतृत्व रमेश मेश्राम यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरल्याने विधानसभेमध्ये वेगवेगळ्या चर्चेला उत्थान आले आहे.
मागील पाच वर्षात भद्रावती, वरोरा क्षेत्रात प्रामुख्याने आदिवासी समाजा हितासाठी आंदोलन, मोर्चे, बेरोजगारांसाठी लढा उभारला , समाजात प्रबोधन मेळावे, समाजातील लोकांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार विरुध्द प्रकरणे हाताळून आंदोलने अशा अनेक सामाजिक कार्यातून आदिवासी समाजात आपले आगळे वेगळे स्थान निर्माण केले. त्यामुळे त्यांचा वाढता जनसंपर्क बघून यावेळेस ते चांगल्या प्रकारे मतदान घेऊन चांगल्या चांगल्याना या निवडणुकीत टक्कर देतील अशी चर्चा या निवडणुकीत जनसामान्य लोकांमध्ये होती. परंतु अचानक यांच्या उमेदवारी अर्ज अपात्रतेमुळे राजकीय राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. राजकीय समीकरणे बिघडले असल्याचे चित्र विधानसभेमध्ये स्पष्ट दिसत आहे.
वरोरा प्रतिनिधी यांनी रमेश मेश्राम यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनीं सांगितले की, निवडणुक अधिकारी यांनी मला उमेदवारी अर्जात त्रुटी असल्याबाबत कसलेही तोंडी सूचना दिलेली नव्हती मला वाटल की माझा अर्ज पात्र ठरला परंतु दुसऱ्यादिवशी छाननी मध्ये मला अपात्र ठरविण्यात आले. या विरोधात मी हायकोर्टात पीटिशन दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रमेश मेश्राम यांनी अजूनपर्यंत कोणत्याही उमेदवारास वा पक्षास समर्थन किँवा पाठींबा जाहिर केलेला नसुन विरोधक पाठींबा जाहिर केल्याच्या खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत . अश्या अफवांना कुनीही विश्वास ठेवू नये योग्यवेळी योग्य उमेदवारास समर्थन जाहीर करणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
समाज हिताच्या मागण्या मान्य करणार्या उमेदवारास नक्की मदत करू असेही आश्वासन त्यांनी दिली. वरोरा भद्रावती क्षेत्रातील ग्रामीण भागातील आदिवासी समाजाचे मतदान गेम चेंजर ठरतील अशी आशा रमेश मेश्राम यांनी व्यक्त केली.
........................,.................
Comments
Post a Comment