ऊस शेतकरी या चिन्हाला जनता मतदान करणार.

ऊस शेतकरी या चिन्हाला जनता मतदान करणार.

वरोरा 
चेतन लुतडे 

वरोरा विधानसभेत अपक्ष उमेदवार राष्ट्रीय पक्षावर जोरदार टीका करीत असून सर्वसामान्याचे राजकारण राहिली नाही अशी परखड भूमिका डॉक्टर चेतन खूटेमाटे  यांनी व्यक्त केली आहे. 

 राजकारणात घराणेशाहीला उधान आले असून आमदारकी, खासदारकी व महत्त्वाची पदे ही आपल्या घरातच कशी राहील यासाठीच प्रस्थापित राजकारणी प्रयत्नात आहे.या निवडणुकीतही प्रमुख पक्षांनी घराणेशाहीतूनच उमेदवार दिले आहे. हा इतर कार्यकर्त्यांवर अन्याय आहे. यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण न होता ते केंद्रित होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत घराणेशाहीला हद्दपार करून नागरीकांच्या समस्यांची जाण असलेल्या  प्रामाणिक उमेदवारालाच आपले मत द्या असे आवाहन अपक्ष उमेदवार डॉ. चेतन खुटेमाटे यांनी मतदारांना केले आहे 

मतदार हे सुज्ञ आहेत कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाहीत. जनतेला तात्पुरते पैसे पाहिजे की पाच वर्षाचा विकास हा प्रश्न उभा राहिला असून राजकारणांनी मतदारांना गृहीत धरणे सोडून द्यावे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Comments