*कर्नाटका एम्टा झेंडी पॉईंटवर महिलेचा मृतदेह आढळला*
*विविध चर्चेला उधान*
अतुल कोल्हे भद्रावती -
केपीसीएल कर्नाटक एम्टा खुला कोळसा खाणीच्या झेंडी पॉईंट वर बरांज (मोकासा ) येथील महिलेचा मृतदेह आढळला ही घटना आज दिनांक ७ रोज गुरुवारला सायंकाळी ६ वाजता उघडकीस आली या घटनेने परिसरात तर्कवितर्क काढण्यात येत आहे
माया झावरु देवगडे वय ५७ वर्ष राहणार बरांज मोकासा असे मृत अवस्थेत आढळलेल्या महिलेचे नाव आहे. कर्नाटक एम्टा कंपनी व प्रकल्पग्रस्त यांच्यात गेल्या वीस वर्षापासून संघर्ष सुरू आहे. त्यात ती महिला सुद्धा प्रकल्पग्रस्त आहे. केपीसीएल खुल्या कोळसा खाणीच्या कोळसा वाहतूक करणाऱ्या झेंडी पॉईंटवर आज मायाचा मृतदेह आढळला ही बुधवारपासून घरी नसल्याने घरील व्यक्ती शोधा शोध घेत होते. या परिसरात घटना घडल्याने विविध चर्चेला उदान फुटले आहे या घटनेची माहिती होताच भद्रावती पोलीस घटनास्थळी पोहोचून चौकशी करीत आहे.
Comments
Post a Comment