वरोऱ्यात भाजपाच्या करण देवतळे यांचा एकहाती ऐतिहासिक विजय*आजोबा आणि वडिलांचा गड पुन्हा केला सर

वरोऱ्यात भाजपाच्या करण देवतळे यांचा एकहाती ऐतिहासिक विजय
*आजोबा आणि वडिलांचा गड पुन्हा केला सर

वरोरा 
चेतन लुतडे 
वरोरा :  विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजेपासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  इमारती मध्ये सुरू झाली.या मतमोजणीत भाजपचे २९ वर्षीय युवा नेता करण देवतळे यांना ६५१७८ मते  मिळवीत प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार मुकेश जीवतोडे यांचा १५ ,४५०  मतांनी पराभव केला. मुकेश जीवतोडे यांना ४९७२० मते मिळाली. वरोरा विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपाचे कमळ फुलवून करण देवतळे यांनी ऐतिहासिक विजय नोंदविला आहे.
 देवतळे यांनी सुरुवातीपासूनच आपली आघाडी सातत्याने कायम ठेवली होती.काँग्रेसचे अधिकृत उमेदवार  प्रवीण काकडे हे २५०४८ मते घेत तिसऱ्या क्रमांकावर राहिले.प्रवीण काकडे हे खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू आहेत. प्रवीण काकडे यांना काँग्रेसची उमेदवारी देऊन घराणेशाही जोपासली अशी टीका होत असल्याने त्यांचा प्रचंड विरोध मतदारसंघात सुरू होता.
    भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष व दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर हेही या निवडणुकीतआपले नशीब अजमावत होते. त्यांना एकूण ९१२३ मते मिळाली.  
   भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व  माजी नगराध्यक्ष  अहेतेश्याम  अली यांनी भाजपाचा राजीनामा देत प्रहारचा झेंडा हाती धरला व प्रहार तर्फे ही निवडणूक लढवली. त्यांना २०७२३ मते मिळाली. ते चौथ्या क्रमांकावर राहिले.
भाजपचे बंडखोर उमेदवार जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती राजू गायकवाड यांनीही बंडखोरी करत आपली निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. त्यांना१३४८२ मतावरच समाधान मानावे लागले.
एकंदरीत या मतदारसंघात प्रथमच भाजपचा झालेला विजय हा या मतदारसंघाच्या राजकीय  भवितव्याला कलाटणी देणारा ठरणार असल्याचे भाकीत केले जात आहे. विजयानंतर करण देवतळे यांची ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करीत मिरवणूक काढण्यात आली.
चंद्रपूर जिल्हा विधानसभा निकाल 2024
राजुरा विधानसभेमध्ये 
 देवराव भोंगळे 72882 मते घेऊन विजयी झाले. 
चंद्रपूर विधानसभेत 
किशोर जोरगेवार105681 मते घेत विजयी झाले.
बल्लारपूर विधानसभा 
सुधीर मुनगंटीवार 105969 मते घेत विजयी झाले. 
वरोरा विधानसभा 
करण देवतळे 65170 मते घेत विजयी झाले.
चिमूर विधानसभा 
कीर्तीकुमार भांगडीया 116495 मते घेत विजयी झाले. 
ब्रह्मपुरी विधानसभा 
विजय वडेट्टीवार 112377 मते घेत विजयी झाले.
-------------------------------------------------

निवडणूक झाल्यानंतर लगेच आमदार करण संजय देवतळे मुंबईसाठी रवाना झाले असून लवकरच मंत्रिमंडळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विजयाचे शिल्पकार माजी मंत्री हंसराज अहिर
ठरले असून हा विजय जनतेचा आहे अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली.
---------------------------------------

Comments