*वीस हजार कोटींची गुंतवणूक व दहा हजार युवकांना रोजगार : ना. देवेंद्र फडणवीस*

*वीस हजार कोटींची गुंतवणूक व दहा हजार युवकांना रोजगार : ना. देवेंद्र फडणवीस*

करण देवतळे निवडून आल्यास पंचवीस हजार लखपती दीदी बनविणार. ना. देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही.

*भद्रावतीत भाजपची प्रचार सभा*

 अतुल कोल्हे भद्रावती :-
                 भद्रावती शहरातील निप्पा‌ण डेन्रोसाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या व सध्या रिकाम्या पडलेल्या जागेवर तेथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे योग्य ते निराकरण करून वीस हजार कोटीचा उद्योग प्रकल्प सुरू करून त्यात परिसरातील दहा हजार युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 भद्रावती- वरोरा विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे अधिकृत उमेदवार करण देवतळे यांच्या प्रचारार्थ शहरातील शिंदे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, उमेदवार करण देवतळे,माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर,हरिश शर्मा, प्रकाश देवतळे,श्वेता देवताळे, अमित गुंडावार, अशोक हजारे, प्रशांत डाखरे  आदी मान्यवर उपस्थित होते.गेल्या अडीच वर्षात महायुतीच्या काळात राज्याने उल्लेखनीय प्रगती केली असून महिलांसोबतच समाजातील प्रत्येक घटकांसाठी विविध योजना आणल्या आहे व त्याद्वारे प्रत्येक समाजाचा विकास साधला जात आहे. शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी पिक विमा,कृषी पंपांना वीज मोफत,शेतमालाला योग्य भाव यासोबतच अनेक योजना दिलेल्या आहेत. भविष्यात राज्यात महायुतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी देऊन करण देवतळे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. मतरूपी आशीर्वाद देऊन मला क्षेत्राच्या सेवेची संधी द्या.मी या क्षेत्रात नवीन रोजगार निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल असे मनोगत उमेदवार करण देवतळे यांनी यावेळी व्यक्त केले.सदर सभेला नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.

Comments