*भाजप कार्यकर्ते माजी उपसरपंच देवदत्त पुंडलिक लोहे यांनी ठोकला भाजपला रामराम….*
*घोडपेठ येथील भाजप पदाधिकारी माजी उपसरपंच देवदत्त पुंडलिक लोहे यांचा जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश*
महाविकास आघाडी च्या उमेदवारला निवडणुन आण्याकरीता शिवसैनिक मतदाराच्या दारोदारी.
फक्त बातमी
(ता. 15) भाजप मध्ये 40 वर्षापासून कार्यरत माजी उपसरपंच तसेच 10 वर्षे सदस्य राहलेले भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथील देवदत्त पुंडलिक लोहे यांनी भाजपला रामराम ठोकीत जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश घेतला.
यादरम्यान देवु लोहे यांनी शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करते वेळी महाविकास आघाडीच्या प्रचारादरम्यान भद्रावती शहर, तालुक्यातील ग्रामीण भागात प्रत्यक्ष चंद्रपुर जिल्हाप्रमुख रविद्रं शिदे,पदअधिकारी व शिवसैनिक मतदाराच्या भेटी घेत असताना घोरपेठ येतील माजी उपसरपंच देवु लोहे यांनी भेट घेवुन उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्याला प्रेरित होवुन व महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात शेती मालाला भाव, सर्वांना न्याय व कोरोना सकंटात केलेली मात या सर्व कार्याची मतदार बंधु दखल घेत असल्याने पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला व भद्रावती तालुक्याचे शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यालय 🚩“शिवनेरी” येते पक्ष प्रवेश घेतला.
या पक्षप्रवेशाप्रसंगी भद्रावती तालुका प्रमुख नंदू पढाल, विधानसभा संघटक मंगेश भोयर, युवासेना तालुका अधिकारी राहुल मालेकर, जेष्ठ शिवसैनिक तथा माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, माजी उपजिल्हाप्रमुख वसंता मानकर, चंदनखेडा विभाग प्रमुख विठ्ठल हनवते, व घोडपेठ येथील शिवसैनिक व पदअधिकारी संजय सुर, धनराज गानफाडे, सुधिर राऊत, शंकर खाडे, भाऊराव वनकर, गजानन कारेकर, वंडू कारेकर, विवेक राऊत आधी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment