*भद्रावती येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील प्रकार*
*अधिकाऱ्यांच्या कर्तव्यकसुरीने 85 वर्षीय वृद्धेला हेलपाट्या*
अतुल कोल्हे भद्रावती :-
बँक कोणतीही असो त्यामधील जेष्ठ नागरिक असलेल्या खातेधारकांना सोयीस्कर तसेच सुलभ सेवा पुरविण्याचे दावे फोल ठरत असल्याने अनेक जेष्ठ नागरिकांना होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे मोठ्या प्रमाणात मरणयातना सोसाव्या लागत आहे.बँकेमधील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यकसुरीमुळे एका 85 वर्षीय वृद्ध आजीबाईला अशाच प्रकारच्या एका यातनेला सामोरे जावे लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती मधील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेत हा प्रकार निदर्शनास आला असून येथील शाखा प्रबंधक यांच्या कामचुकार वृत्तीने पीडित वृद्ध महिलेला विनाकारण दोन दिवस बँकेच्या हेलपाट्या माराव्या लागूनही त्या निराधार महिलेला रिकाम्या हाती माघारी फिरावे लागले आहे.
यामुळे सुज्ञ नागरिकांत प्रचंड संतापाचे वातावरण आहे.
सदर प्रकाराची हकीकत असी की स्थानिक भद्रावती शहरातील गवराळा वार्ड येथील एक 85 वर्षीय वृद्ध महिलेचे त्यांचे 90 वर्षीय पती यांचेसह एक जुने संयुक्त बचत खाते क्र.60128937509 आहे. नुकतेच या महिलेच्या पतीचे निधन झाल्याने तिला पुढील रितीरीवाजा करिता पैस्यांची अतिशय निकड असल्यामुळे ती महिला काठीच्या आधाराने दि.12 नोव्हेंबर रोजी बँकेत गेली असता त्या दिवशी गर्दी असल्याने तेथील बावनकुळे नामक अधिकाऱ्यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले.ती महिला त्या दिवशी आल्या पावली माघारी आली.नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.13 नोव्हेंबर रोजी ती पुन्हा बँकेत गेली तेव्हा त्यांचा मुलगा सोबत होता.महिलेला शारीरिक व्याधीमुळे चालता येत नसल्याने ती बँकेच्या बाहेर वाहनातच बसून होती.मुलगा बँकेत तिचे आधार कार्ड आणि पासबुक घेऊन आधी तेथील शाखा प्रबधांकाना भेटला. तेव्हा प्रबंधकांनी महिलेचे पासबुक तथा पासबुक न बघता मुलाला महिलेचा पैसे काढण्याचा फार्म भरण्यास सांगितले.फार्म भरल्यानंतर महिलेच्या अंगठ्याचा ठसा घेण्यासाठी म्हणून बँकेतील कनिष्ठ अधिकारी बावनकुळे हे स्वता वाहनाजवळ आले होते.ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर अर्धा तास रांगेत उभे राहिलेल्या मुलाला पैसे मिळणार नाही असे सांगण्यात आले.सदर प्रकराबद्दल बावनकुळे यांना विचारपूस केली असता त्यांनी सी के वाय सी करावी लागेल असे कारण सांगून हात वर केले.हा प्रकार बाहेर बसलेल्या त्या वृद्ध महिलेला कळताच तिच्या डोळ्यात असलेलं पाणी काहींना बघवता न आल्याने बँकेच्या या बेजबाबदार कर्तव्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
-------बॉक्स----
*सी के वाय सी बद्दल आधी का माहिती दिली नाही ?..*
सदर पीडित वृद्ध महिला ही आदल्या दिवशी जेव्हा बँकेत गेली होती तेव्हा बँकेच्या शाखा प्रबंधकाला तिच्या पतीच्या निधनाची माहिती देण्यात आली होती.मात्र मृत्यूचा दाखला मिळाला नसल्याने त्या संयुक्त खात्यातून तिला पैसे काढण्याचा अधिकार होता. परंतु बँकेने गर्दीचे कारण सांगून तिचे खाते के वाय सी आहे किंवा नाही हे न बघता तिला दुसऱ्या दिवशी कशाला बोलावले.वृद्ध महिला ही शारीरिक व्याधीने ग्रस्त असल्याने तिला चालता फिरता येत नाही तरी सुद्धा पैस्यांची अत्यंत गरज असल्यामुळे ती परत बँकेत गेली.पैसे काढण्याच्या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर त्या महिलेचे खाते सी के वाय सी करावे लागते असे सांगणे म्हणजे बँकेतील अधिकारी आधी निद्रावस्थेत होते का असा सवाल यावेळी उपस्थित केल्या जात आहे.85 वर्षीय त्या निराधार वृद्ध महिलेला झालेला मानसिक आणि शारीरिक त्रास याकरिता कोण जबाबदार आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे.
*बँकेत होत असलेल्या मानसिक त्रासाच्या वाढत्या तक्रारी*
सदर प्रकारावरून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा भद्रावती येथील इतर ग्राहकांना बँकेच्या व्यवहाराबद्दल विचारपूस केली असता येथील अधिकारी तसेच कर्मचारी ग्राहकांशी उद्दट वार्तालाप करत असून त्यामुळे जेष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.ग्राहकांशी सभ्य वागणूक देऊन त्यांना सहकार्य करणे हे बँकेतील अधिकारी तथा कर्मचाऱ्यांचे कर्तव्य असूनही ते आपल्या कर्तव्याला का चुकतात याचा जाब त्यांना कोण विचारणार ?. असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.
Comments
Post a Comment