महापरिनिर्वाण दिनासाठी जिल्ह्यातून विशेष रेल्वे ची मागणी - खा. प्रतिभा धानोरकर


महापरिनिर्वाण दिनासाठी जिल्ह्यातून विशेष रेल्वे ची मागणी - खा. प्रतिभा धानोरकर

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायी 06 डिसेंबर रोजी मुंबई ला जाणार आहेत. त्याकरीता बल्लारपूर येथून मुंबई करीता अप-डाऊन विशेष रेल्वे सेवा देण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चेअरमन रेल्वे बोर्ड व मध्य रेल्वेच्या मुख्य महाप्रबंधक यांना पत्राद्वारे केली आहे.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 06 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन असल्याने  जिल्ह्यातून लाखो अनुयायी अभिवादनाकरीता मुंबई ला जाणार आहेत. परंतु,  जिल्ह्यातून मुंबई ला जाण्याकरीता नियमित रेल्वे सेवा नसल्याने अनुयायांची अडचण निर्माण होत आहे. याकरीता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी  मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक तसेच चेअरमन रेल्वे बोर्ड यांना पत्र लिहून दि. 04 डिसेंबर ला मुंबई जाणारी व 07 डिसेंबर ला बल्लारपूर ला येणारी विशेष रेल्वे सेवा देण्याची मागणी करण्यात आली आहे. चंद्रपूर  जिल्ह्यात बौध्द अनुयायांची संख्या मोठी असल्याने महामानवास अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांना जाता येणार आहे. वरील मागणी ची तात्काळ दखल घेण्याची विनंती देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

Comments