आदिवासी समाज खंबीरपणे पाठीशी राहील.
महाविकास आघाडीने माना समाजाकडे दुर्लक्ष केले माजी राज्यमंत्री गजभे यांचा आरोप
वरोरा
चेतन लुतडे
जाहिरात
मागील लोकसभेमध्ये माना समाजाने महाविकास आघाडीला मदत करीत पाच खासदार सहा जिल्ह्यातील निवडून दिले होते.
तरी मात्र आमच्या समाजाकडे दुर्लक्षच करण्यात आल्याची खंत माजी राज्यमंत्री गजभे यांनी व्यक्त केली.
त्यामुळेच गजबे यांनी भाजपामध्ये प्रवेश घेत घरवापसी केली होती. जिल्ह्यात आदिवासी समाजाचे भरपूर प्रश्न प्रलंबित असून आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आदिवासी माना समाजाने वरोरा भद्रावती विधानसभेत भाजपाची उमेदवार करण देवतळे यांना भरभक्कम पाठिंबा दर्शविला आहे. गजभे यांच्या भेटीने भाजप उमेदवार करण देवतळे यांची बाजू वरचढ ठरली असून जिल्ह्यामध्ये खास करून वरोरा भद्रावती विधानसभेत आदिवासी माना समाज महायुतीच्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली. यावेळी दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करीत आदिवासी समाजाचा पाठिंबा करण देवतळे यांना जाहीर केला.
यावेळी युवा नेते करण देवतळे यांच्यासोबत माजी राज्यमंत्री रमेश गजभे, राजू दोडके, राहुल बांदुरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
जाहिरात
Comments
Post a Comment