*मुंबईच्या स्नेह परिवारातील समाजसेवकांचा सत्कार* *स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चाँरिटेबल ट्रस्टचा उपक्रम*
*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चाँरिटेबल ट्रस्टचा उपक्रम*
भद्रावती
फक्त बातमी
मुंबई येथील स्नेह परिवारातील सदस्य नुकतेच भद्रावती येथील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी आले. या भेटी दरम्यान स्नेह परिवारातील समाजसेवक अशोक वायकुळ, ममता वायकुळ, विनय पाटील आणि संजय पाटील यांनी ट्रस्टचे संस्थापक तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख (वरोरा -भद्रावती व राजुरा विधानसभा क्षेत्र) रविंद्र शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले आणि कोषाध्यक्षा तथा माजी नगरसेविका सुषमाताई शिंदे यांच्या शुभहस्ते समाजसेवक अशोक वायकुळ, ममता वायकुळ, विनय पाटील आणि संजय पाटील यांचा वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रतिमा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
भेटी दरम्यान अशोक वायकुळ, ममता वायकुळ, विनय पाटील आणि संजय पाटील यांनी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चाँरिटेबल ट्रस्टच्या समाजकार्याची सविस्तर माहिती घेतली. ट्रस्टचे संस्थापक तथा शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख (वरोरा -भद्रावती व राजुरा विधानसभा क्षेत्र) रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेले सामाजिक कार्य अत्यंत प्रेरणादायी व प्रसंशनीय असल्याचे मत स्नेह परिवारातील समाजसेवकांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment