वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

*जिल्ह्यासाठी सहा निवडणूक निरीक्षक निश्चित** तीन सामान्य निरीक्षक, दोन खर्च पथक तर एक कायदा व सुव्यवस्था निरीक्षक*

*जिल्ह्यासाठी सहा निवडणूक निरीक्षक निश्चित*

* तीन सामान्य निरीक्षक, दोन खर्च पथक तर एक कायदा व सुव्यवस्था निरीक्षक*

अकूंश अवथे चंद्रपूर 
चंद्रपूर, दि. 30 :  जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक निश्चित झाले असून यात तीन सामान्य निरीक्षक, दोन खर्च पथक निरीक्षक तर एक कायदा व सुव्यवस्था निरीक्षक आहेत.

*सामान्य निवडणूक निरीक्षक* : 70 – राजूरा व 71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघासाठी आर. मुत्यालाराजु रेवु (आय.ए.एस. आंध्र प्रदेश) निवडणूक निरीक्षक असून संपर्कासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक 9405671147 आहे. निवडणूक कालावधीत त्यांच्या निवासाचा पत्ता ‘पांगारा’ कक्ष, वन अकादमी, मुल रोड चंद्रपूर येथे असून चंद्रपूर व राजुरा मतदारसंघातील नागरीक व राजकीय पदाधिका-यांसाठी ते दररोज सकाळी 11 ते 12 या वेळेत वन अकादमी येथील ‘पांगारा’ कक्षात उपलब्ध असतील.
72 – बल्लारपूर व 73 -ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून संगिता सिंग (आय.ए.एस. बिहार) असून संपर्कासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक 9145768992 आहे. त्यांच्या निवासाचा पत्ता ‘शामली’ कक्ष, वन अकादमी, चंद्रपूर येथे असून नागरीक व राजकीय पदाधिका-यांसाठी त्या दररोज सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत वन अकादमी येथील ‘शामली’ येथे उपलब्ध असतील.

74 – चिमूर व 75 - वरोरा विधानसभा मतदारसंघाकरीता संजय कुमार (आय.ए.एस. उत्तर प्रदेश) असून संपर्कासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक 9403473147 आहे. त्यांच्या निवासाचा पत्ता ‘पलाश’ कक्ष, वन अकादमी, चंद्रपूर येथे आहे. नागरिकांसाठी दररोज सकाळी 10 ते 11 या वेळेत ते वन अकादमी येथील ‘पलाश’ येथे उपलब्ध असतील.

*खर्च पथक निरीक्षक* : 70 – राजुरा, 71 – चंद्रपूर आणि 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासाठी खर्च पथक निरीक्षक म्हणून आदित्य बी. (आय.आर.एस.) असून त्यांचा मोबाईल क्रमांक 9422580147 आहे. त्यांच्या निवासाचा पत्ता खोली क्रमांक 203, पहिला माळा, रामबाग रेस्ट हाऊस, चंद्रपूर आहे. नागरिकांसाठी तसेच राजकीय पदाधिका-यांसाठी ते सकाळी 10 ते 12 या वेळेत रामबाग रेस्ट हाऊस, चंद्रपूर येथे उपलब्ध असतील.

73 – ब्रम्हपुरी, 74 – चिमूर आणि 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघासाठी खर्च पथक निरीक्षक म्हणून धर्मेंद्र सिंह (आय.आर.एस.) असून त्यांचा मोबाईल क्रमांक 9145767949 आहे. त्यांच्या निवासाचा पत्ता खोली क्रमांक 201, पहिला माळा, रामबाग रेस्ट हाऊस, चंद्रपूर आहे. नागरिकांसाठी तसेच राजकीय पदाधिका-यांसाठी ते सकाळी 11 ते 12 या वेळेत रामबाग रेस्ट हाऊस, चंद्रपूर येथे उपलब्ध असतील.

*कायदा व सुव्यवस्था निरीक्षक* : जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघासाठी कायदा व सुव्यवस्था निरीक्षक म्हणून अवधेश पाठक (आय.पी.एस.) असून त्यांचा मोबाईल क्रमांक 9404063147 आहे. त्यांचा निवासाचा पत्ता ‘बकूल’ वन अकादमी, चंद्रपूर असून नागरिकांसाठी ते सकाळी 10 ते 11 या वेळेत उपलब्ध राहणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी कळविले आहे.

Comments