वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

*महिलांनी स्वत्वाला जपून स्वसंरक्षण करावे : सौ केशनी हटवार**संत नगाजी महाराज पुण्यतिथी निमित्त महिला संमेलन संपन्न*

*महिलांनी स्वत्वाला जपून स्वसंरक्षण करावे : सौ केशनी हटवार*

*संत नगाजी महाराज पुण्यतिथी निमित्त महिला संमेलन संपन्न*

अतुल कोल्हे भद्रावती :-
              भद्रावती येथील नगाजी महाराज मंदिर मंजुषा ले आऊट परिसरात संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव संपन्न झाले. या दोन दिवसीय संमेलनात विविध उपक्रम राबविण्यात आले. महिला संमेलनात प्रमुख मार्गदर्शक सौ. केशनी ज्ञानेश हटवार भद्रावती यांनी मार्गदर्शन करताना "महिलांनी स्वत्वाला जपून स्वसंरक्षण करावे" असे मार्गदर्शन केले.

संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव आयोजित दोन दिवशी पुण्यतिथी महोत्सवात पहिल्या दिवशी दि. १८/१०/२०२४ ला  महिलांसाठी रांगोळी स्पर्धा,  पाककला स्पर्धा तसेच महिला संमेलन आयोजित करण्यात आले होते. या महिला सम्मेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ निताताई  आंबिलकर , मार्गदर्शक सौ केशनी ज्ञानेश हटवार, प्रमुख अतिथी सौ संगीताताई घोरपडे, सौ. सुरेखाताई अतकरे ह्या व्यासपीठावर उपस्थित होत्या. महिला संमेलनाला मार्गदर्शन करताना "आज साक्षरतेचे प्रमाण वाढूनही महिला अत्याचाराचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे महिलांनी स्वत्वाला जपून आत्मसंरक्षण करावे, त्यासाठी जागृत राहून खंबीर पावले उचलावी व आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जावे" असे मार्गदर्शन सौ. केशनी ज्ञानेश हटवार यांनी केले.

यावेळी मंचावर उपस्थित पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व स्त्रीशक्तीला जागृत  केले. प्रमुख अतिथींच्या हस्ते रांगोळी स्पर्धा व पाककला स्पर्धेचे प्ररिक्षण करून विजेत्या महिलांना  पारितोषिक देऊन सन्मानीत करण्यात आले.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वर्षाताई वाटेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ.  मोनाताई जांभूळकर यांनी केले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला संमेलन यशस्वी करण्यासाठी  सौ. रागिनी सुत्रपवार, सौ. प्रतिभा दक्षिणे सौ.भुवनेश्वर निंबाळकर, सौ. सविता लांडगे आदी महिलांनी परिश्रम घेतले.

Comments