अतुल कोल्हे भद्रावती :-
औदुंबर कल्प वृक्ष असून औदुंबर वृक्षातळी श्री दत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी, श्री नृसिंहसरस्वती स्वामी यांचा सदैव वास असतो.त्यामुळे दत्त संप्रदायात औदुंबर प्रदक्षिणेला अतिशय महत्त्व आहे.या उद्देशाने
श्री गणेशदत्त गुरू पंचायतन मंदिर
भद्रावती येथे श्रीगुरूव्दादशीच्या
पुण्य पर्वावर दिनांक २९ ऑक्टोंबर २०२४ रोज मंगळवारला औदुंबर प्रदक्षिणा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम
आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ६.१० वाजता सामुहिक
संकल्पोच्चार, पुजा पाठ, अभिषेक, संगीत अखंड औदुंबर
प्रदक्षिणा सूर्योदय ६.१३ पासून
सूर्यास्त ५.४० चालणार आहे.
सायंकाळी ५.५५ ते ७.०० पर्यंत
श्रींची पालखी प्रदक्षिणा होणार
आरती नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा व प्रदक्षिणा सोहळ्यात सहभागी होवून या
या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प.पु.श्री.विष्णुदास
स्वामी महाराज अध्यात्म साधना केंद्र भद्रावती तर्फे करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment