भद्रावतीत ग्रेटा एनर्जीच्या इंटिग्रेटेड ग्रीन स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन; मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री रेड्डी यांच्या हस्ते संपन्न

भद्रावतीत ग्रेटा एनर्जीच्या इंटिग्रेटेड ग्रीन स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन; मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री रेड्डी यांच्या हस्ते संपन्न भद्रावती, चेतन लूतडे  ता. १४ मार्च : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे ग्रेटा एनर्जीच्या इंटिग्रेटेड ग्रीन स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय कोळसा व खाण मंत्री किशनजी रेड्डी साहेब यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. हा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रीन स्टील निर्मितीला चालना मिळणार असून, उद्योग, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि स्थानिक विकास यांचा समतोल साधण्यात हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादय यावेळी करण्यात आले. याप्रसंगी मंत्री डॉ. अशोकजी उईके, राज्यमंत्री अॅड. आशिषजी जयस्वाल, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराजभैया अहीर, खासदार प्रतिभाताई धनोरकर, आमदार करणभाऊ देवतळे, आमदार किशोरजी जोरगेवार, आमदार देवराव...

मुल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासह सर्वसामान्यांच्या सेवेचा संकल्प - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार**मारोडा येथे भव्य नेत्र चिकित्सा शिबीर*

मुल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासह सर्वसामान्यांच्या सेवेचा संकल्प -  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार*

*मारोडा येथे भव्य नेत्र चिकित्सा शिबीर*

चंद्रपूर, दि.06 : जनतेचे आरोग्य उत्तम राहावे, दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. लोकांच्या आरोग्यासाठी सहकार्याचा हात पुढे करत दिव्यांग बांधवांना स्वयंचलित सायकलीचे वाटप, बालकांच्या हृदयाची शस्त्रक्रिया, 50 हजारपेक्षा जास्त लोकांचे नेत्र चिकित्सा शिबिर, 35 हजारपेक्षा जास्त लोकांना चष्मेवाटप तर पाच हजारपेक्षा जास्त लोकांच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून मुल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासह सर्वसामान्यांची सेवा करण्याचा संकल्प केला असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
मारोडा येथे माता कन्यका सेवा संस्था, चंद्रपूर यांच्या माध्यमातून व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून भव्य नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच (मारोडा) भिकाजी शेंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, चंदु मारगोनवार, प्रेमदास गेडाम, जयश्री वेलकेवार, नंदु रणदिवे, प्रियंका नरमलवार तसेच नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

मतदारसंघाचा विकास साधतांना येथील नागरीकांना अपेक्षित असलेली विकासकामे मार्गी लावली आहेत, असे सांगून पालकमंत्री  श्री. मुनगंटीवार म्हणाले,  मुल ते मारोडा रस्ता, कृषी महाविद्यालय, सिमेंट काँक्रिट रोड, मारोडा रेल्वे थांबा आदि विविध कामे पुर्णत्वास आली असून या ठिकाणचे प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तम व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.  मारोडा गाव विकसीत व्हावे यासाठी येथे कृषी महाविद्यालयाची उभारणी करण्यात येत आहे. प्रत्येक गावाच्या विकास कामांसाठी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. मारोडा येथील तलावाचे सौंदर्यीकरण, वाचनालय, महादेव मंदिराचा जीर्णोद्धार आदी विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून मारोडा प्रवेशद्वार उभारण्याची येथील गावकऱ्यांची मागणी होती, हि मागणी लक्षात घेवून प्रवेशद्वार (गेट) उभारणीसाठी वनविभागाच्या ताडोबा फाऊंडेशनच्या माध्यमातून 25 लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले. 

मंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, नेत्रचिकित्सा शिबिराच्या माध्यमातून जेष्ठांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र (पी.एच.सी) उत्तम करण्यात आल्या असून राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती करुन मतदार संघातील पाच उपकेंद्रांना विशेष बाब म्हणून मान्यता मिळवून दिली. तसेच मुल येथील ग्रामीण रुग्णालय अत्याधुनिक करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. भोई समाजासाठी मच्छीमार कल्याणकारी  महामंडळाच्या स्थापनेस मंत्रीमंडळाने नुकतीच मान्यता दिली. शबरी आवास, रमाई आवास, प्रधानमंत्री आवास व इतर आवास योजनेसाठी देण्यात येणारे अनुदान 1.30 लाखावरुन रु. 2.50 लाख केले. निराधार योजनेच्या अनुदानात 600 रुपयावरुन 1500 रुपये वाढ दिली. रस्ते हि ग्रामीण विकासाची रक्तवाहिनी आहे. ग्रामीण भागातील पाणंद रस्ते तसेच शहरातील मुख्य रस्ते उत्तम केले. राज्यपाल महोदयांनी पोंभुर्णा क्षेत्रातील रस्त्यांच्या कामांचे कौतूक केले असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी आवर्जुन सांगितले.

 सर्व जाती, धर्माच्या विकासासाठी कार्य केले असून 50 वर्षात न झालेली विकासकामे येत्या 10 वर्षात पुर्णत्वास नेली असून मारोडा वासियांनी विकासाची गंगा थांबू देवू नये असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
00000

Comments