भद्रावतीत ग्रेटा एनर्जीच्या इंटिग्रेटेड ग्रीन स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन; मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री रेड्डी यांच्या हस्ते संपन्न

भद्रावतीत ग्रेटा एनर्जीच्या इंटिग्रेटेड ग्रीन स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन; मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री रेड्डी यांच्या हस्ते संपन्न भद्रावती, चेतन लूतडे  ता. १४ मार्च : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे ग्रेटा एनर्जीच्या इंटिग्रेटेड ग्रीन स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय कोळसा व खाण मंत्री किशनजी रेड्डी साहेब यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. हा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रीन स्टील निर्मितीला चालना मिळणार असून, उद्योग, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि स्थानिक विकास यांचा समतोल साधण्यात हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादय यावेळी करण्यात आले. याप्रसंगी मंत्री डॉ. अशोकजी उईके, राज्यमंत्री अॅड. आशिषजी जयस्वाल, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराजभैया अहीर, खासदार प्रतिभाताई धनोरकर, आमदार करणभाऊ देवतळे, आमदार किशोरजी जोरगेवार, आमदार देवराव...

व्हॉईस ऑफ मीडिया'च्या लढ्याला मोठे यश पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ

'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या लढ्याला मोठे यश 
पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ
 
तेरा वेळा आंदोलन, राज्यभरात साखळी उपोषण
महामंडळासाठी उभारला होता तीन वर्ष मोठा लढा

मुंबई (प्रतिनिधी) : जगभरामध्ये ४३ देशांमध्ये कार्यरत असणाऱ्या 'व्हॉईस ऑफ मीडिया' या आंतरराष्ट्रीय संघटनेने महाराष्ट्रामध्ये पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ असावे, यासाठी तब्बल तीन वर्ष लढा दिला होता. साखळी उपोषण, आंदोलन, मागण्यांचे निवेदन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १२ मिटिंग केल्यावर आज अखेर पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतला. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर 'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या सर्व शिलेदार, पदाधिकारी, सदस्य यांनी राज्यभर आपला आनंद उत्सव साजरा केला. 

मंत्रालयासमोर आंदोलन,आझाद मैदानावर आंदोलन, नागपूर अधिवेशन काळात आंदोलन, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील समोर आंदोलन, विभागीय आणि राज्यात साखळी आंदोलन असे तब्बल तेरा मोठी आंदोलने केल्यावर आज अखेर राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने 'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी असणाऱ्या महामंडळाला मंजुरी दिली.  
'व्हॉईस ऑफ मीडिया'चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांच्या सुपीक कल्पनेतून पत्रकारांसाठी, वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठी महामंडळ असावे ही मागणी पुढे आली होती.  त्यानंतर 'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या माध्यमातून राज्यभर तब्बल तीन वर्ष या मागणीसाठी राज्यात लढा उभारला होता. माध्यमांमध्ये काम करणारा पत्रकार आणि त्या पत्रकारितेचा खरा चेहरा असणारा वृत्तपत्र विक्रेता या दोघांचेही स्वतंत्र महामंडळ असावे, अशी संकल्पना सातत्याने पुढे येत गेली. अनेक आंदोलनांनंतर आणि मागण्यांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल १२ वेळा या संदर्भातल्या बैठका घेतल्या, 'व्हॉईस ऑफ मीडिया'ने आझाद मैदानावर केलेल्या अनेक आंदोलनाला मुख्यमंत्र्यांनी विनायक पात्रुडकर यांना पाठवून व्हॉईस ऑफ मीडियाचे साखळी उपोषण सोडवले होते. तब्बल तेरा वेळा मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग झाल्यावर चार दिवसांपूर्वी शेवटची मिटिंग झाली. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महामंडळला मंजुरी घेण्यासाठी पुढाकार घेतो, असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिला होता. राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनयांच्या सोबत वारंवार केलेल्या मिटिंगमधून या कामाला अजून अधिकची गती मिळाली. दोन महामंडळ या मागणीवर मंत्रिमंडळाने आज अखेर शिक्कामोर्तब केले. याशिवाय पत्रकारांचे असणारे अनेक विषय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आले, त्यालाही मंजुरी देण्यात आली. 'व्हॉईस ऑफ मीडिया'चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांचे दूरध्वनीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री हेमंत पाटील, आ. सत्यजित तांबे यांनी अभिनंदन केले. आज राज्यभरामध्ये 'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या सर्व कार्यालयांसमोर फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. 
...... 

फोटो ओळ : पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ असावे अशी मागणी  गेल्या तीन वर्षांपासून 'व्हॉईस ऑफ मीडिया'ने सरकारकडे केली होती. अनेक वेळा आंदोलन, उपोषण केल्यावर आज अखेर कॅबिनेट मंत्रिमंडळाने 'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या मागणीला मंजुरी दिली. 'व्हॉईस ऑफ मीडिया'ला मिळालेल्या या मोठ्या यशाचा आनंदउत्सव आज मुंबईतील नरिमन पॉईंट येथील 'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला. 'व्हॉईस ऑफ मीडिया'चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी,  'व्हॉईस ऑफ मीडिया'चे इंटरनॅशनल चीफ गगन महोत्रा यांनी मिठाई भरवून आनंद साजरा केला गेला. यावेळी 'व्हॉईस ऑफ मीडिया'ची संपूर्ण कार्यालयीन टीम उपस्थित होती. 
   ......

Comments