वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

*बल्लारपूरला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी कटिबद्ध**पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ग्वाही* *३ कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे भूमिपूजन*

*बल्लारपूरला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी कटिबद्ध*

*पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ग्वाही* 

*३ कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे भूमिपूजन*

अकूंश अवथे चंद्रपूर 

बल्लारपूर, दि.१३ - बल्लारपूर शहरात विकासकामे करताना कधीही भेदभाव केला नाही. कुणी छोटीशी सूचना केली तरीही त्यावर अंमल करून मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. या मतदारसंघाला कायम प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी काम केले आहे. भविष्यातही त्याच दिशेने तत्पर राहण्यास मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

बल्लारपूर येथील दिलीप टॉकीज ते श्री मनोज खत्री यांच्या घरापर्यंत तीन कोटी रुपयांच्या सिमेेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला  हरीश शर्मा, मनीष पांडे, निलेश खरबडे, वैशाली जोशी, प्रभाकर गुंडावार, डॉ जयदेव पुरी, दीपक मिश्रा, मनोज खत्री , संध्या मिश्रा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘शहरातील इतर रस्त्यांप्रमाणेच उत्तम असा सिमेंट रस्ता व्हावा, अशी इच्छा स्थानिक नागरिकांनी पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली होती. हरीश शर्मा, निलेश खरवडे, मनीष पांडे यांनी माझ्याकडे निवेदन दिले होते. मला आनंद होतोय की आता त्या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे आणि रस्त्याचे काम आज सुरू होत आहे.’

*मजबूत रस्ते, मजबूत विकास!* 
तहसील कार्यालय, एसडीओ कार्यालय, सैनिक स्कुल, बॉटनिकल गार्डन, पाण्याची योजना, बस स्टॅण्ड, रस्त्यांचे विभाजन, विद्यापीठाची स्थापना यापैकी कुठलीही कामे असोत किंवा रस्त्यांची कामे असोत, बल्लारपूरचा विकास कसा होईल याचाच कायम प्रयत्न झाला आहे. रस्त्यांचाच विचार केला तर या शहरात ९० टक्के रस्ते मजबूत झाले आहेत. जे काम महाराष्ट्रात कोणत्याही विधानसभा मतदारसंघात तेथील लोकप्रतिनिधीने केले नाही, तेवढे आपण बल्लारपूरमध्ये केले आहे. अनेकांनी चंद्रपूर जिल्ह्याचे कौतुक केले आहे. पण ते माझे कौतुक नसून जनतेचे आहे. कारण लोकांनी मला निवडून दिले म्हणूनच मला काम करण्याची संधी मिळाली, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
0000

Comments