भद्रावतीत ग्रेटा एनर्जीच्या इंटिग्रेटेड ग्रीन स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन; मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री रेड्डी यांच्या हस्ते संपन्न

भद्रावतीत ग्रेटा एनर्जीच्या इंटिग्रेटेड ग्रीन स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन; मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री रेड्डी यांच्या हस्ते संपन्न भद्रावती, चेतन लूतडे  ता. १४ मार्च : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे ग्रेटा एनर्जीच्या इंटिग्रेटेड ग्रीन स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय कोळसा व खाण मंत्री किशनजी रेड्डी साहेब यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. हा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रीन स्टील निर्मितीला चालना मिळणार असून, उद्योग, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि स्थानिक विकास यांचा समतोल साधण्यात हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादय यावेळी करण्यात आले. याप्रसंगी मंत्री डॉ. अशोकजी उईके, राज्यमंत्री अॅड. आशिषजी जयस्वाल, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराजभैया अहीर, खासदार प्रतिभाताई धनोरकर, आमदार करणभाऊ देवतळे, आमदार किशोरजी जोरगेवार, आमदार देवराव...

चंद्रपूर जिल्हा बँकेत लिपीक, शिपाई पदांसाठी भरती; जाहिरात प्रसिद्ध अर्ज सुरू


चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई व लिपिक पदासाठी नोकर भरती


चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Chandrapur District Central Cooperative Bank) अंतर्गत लिपीक व शिपाई पदांच्या (Clerk and Peon Recruitment) एकूण ३५८ पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी ८ ऑक्टोबरपासून बँकेचे अधिकृत संकेतस्थळ  http://cdccbank.co.in/ वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत १९ ऑक्टोबर (Deadline October 19) देण्यात आली आहे. 

Follow the Faktbatami channel on WhatsApp: 

 बँकेतील एकुण ३५८ रिक्त जागांपैकी लिपीक पदाच्या २६१ तर शिपाई पदाच्या ९७ जागांसाठी ही भरती राबवण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी उमेदवारांचे वय हे १८ ते ४५ वर्षाच्या मध्ये असणे आवश्यक आहे. लिपीक पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेचा पदवीधर व MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर शिपाई पदांसाठी १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

अर्जाची लिंक ८ ऑक्टोबर सकाळी ११ ते १९ ऑक्टोबर रात्री १२ वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे. त्यापूर्वी उमेदवारांना अर्ज परीक्षा शुल्क भरावा लागणार आहे. रिक्त पदे भरतीच्या अनुषंगाने अधिक माहिती/निकष/पात्रता/अटी शर्ती व इतर तपशिल  

Follow the Faktbatami channel on WhatsApp: 

https://www.cdccrecruitment.in/home 

संकेत स्थळावर उपलब्ध आहे. अर्ज स्विकारणेची अंतिम तारीख दिनांक १९ ऑक्टोबर रात्री १२.०० वाजेपर्यंत राहील. त्यानंतर बँकेकडे थेट किंवा पोस्ट/कुरिअर व्दारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. 



Comments