*प्रा. डॉ. संदिप ताजने यांना आचार्य पदवी*

*प्रा. डॉ. संदिप ताजने यांना आचार्य पदवी* वरोडा : शाम ठेंगडी         येथील आनंदनिकेतन महाविद्यालयातील प्रा. डॉ. संदिप एस. ताजने यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे बेचाळीसाव्या दीक्षांत समारंभात आचार्य पदवी देऊन गौरवण्यात आले.      प्रा. डॉ. संदिप  ताजने 2016 पासून आनंद निकेतन महाविद्यालयात वाणिज्य विभागात तासिका तत्वावर कार्यरत आहेत.  प्रा. डॉ. संदिप ताजने यांनी वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेत “चंद्रपूर जिल्ह्यातील रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या महिला कामगारांचे आर्थिक व सामाजिक दृष्टीकोनातून एक चिकीत्सक अध्ययन” या विषयावर  संशोधन प्रबंध लिहून सादर केला होता.  त्यांना संशोधनाचे हे कार्य पूर्ण करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर येथील  शिवरामजी मोघे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ राधेश्याम बी चौधरी यांनी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यात अनेक सहकारी आणि मित्रपरिवार आणि आई वडिल यांचेही त्यांना सहकार्य मिळाले. त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.

*वरोडा शहरात पुन्हा एक विनयभंगाची घटना.* *मेडिकल स्टोर मध्ये केला विनयभंग.*

*वरोडा शहरात पुन्हा एक विनयभंगाची घटना.* 
*मेडिकल स्टोर मध्ये केला विनयभंग.*

वरोडा : श्याम ठेंगडी 

       वरोडा शहरात पुन्हा एक विनयभंगाची घटना घडल्यामुळे खळबळ माजली आहे. ही घटना मेडिकल स्टोअर मध्ये काम करणाऱ्या महिलेसोबत घडली.
     शहराच्या मध्यभागी आंबेडकर चौकात असलेल्या एका मेडिकल स्टोअर्स मध्ये ही घटना दोन दिवसापूर्वी  घडली.
        मिळालेल्या माहितीनुसार असे कळते, की या मेडिकल स्टोर मध्ये एक तरुणासह  एक महिलाही काम करते. या मेडिकल दुकानाला लागूनच स्टोर रूम आहे. या स्टोर रूमला मधून सामान आणण्यासाठी काल या तरुणीला पाठवण्यात आले. तिच्या मागे जाऊन या तरुणाने तिचा विनयभंग केला. त्यामुळे ही तरुणी घाबरून गेली. बाहेर येऊन तिने या घटनेची तक्रार पोलीस स्टेशनला केली. 
       घटना घडल्याचे कळताच शहरात पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे.  पोलिसांनी तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरेने हालचाल करत पोलिसांनी आरोपीस शहरातील एका बियर बार मधून अटक केली.
     पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गौरकार हे घटनेची चौकशी करीत आहेत.

Comments