खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

गुरुदेव भक्तांचा जागर मेळावा.... _चला बदल घडवूया चा आध्यात्मिक उपक्रम_

गुरुदेव भक्तांचा जागर मेळावा....

 _चला बदल घडवूया चा आध्यात्मिक उपक्रम_ 

फक्त बातमी 
चेतन लुतडे 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृती पर मौन श्रद्धांजली निमित्य श्री. गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने भव्य गुरुदेव भक्त व महिला जागर मेळाव्याचे आयोजन वरोरा येथील शगुन मंगल कार्यालयात रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात आलेले आहे.

वरोरा भद्रावती क्षेत्रातील गुरुदेव भक्त व महिला यांच्या करिता डॉ. चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतून *चला बदल घडवूया* उपक्रमांतर्गत भव्य जागर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसंगी अमरावती गुरुकुंज मोझरी येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प.  काळे महाराज यांचे मार्गदर्शन गुरुदेव भक्तांना लाभणार आहे .तसेच विवेकवादी विचारवंत तथा प्रबोधनकार श्री. दिलीप सोळंके हे 'महिला सक्षमीकरणात विवेकाचा वापर' या विषयावर उपस्थित बंधू भगिनींसोबत संवाद साधणार आहेत . तरी या अध्यात्मिक  पर्वणी चा लाभ वरोरा -भद्रावती क्षेत्रातील संपूर्ण गुरुदेव भक्त तथा महिला भगिनींनी घ्यावा असे आवाहन श्री.गुरुदेव सेवा मंडळ वरोरा ,भद्रावती यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे.

Comments