*बरांज तांडा येथे हातभट्टीवर पोलिसांची धाड : तीन आरोपींना अटक*

*बरांज  तांडा येथे हातभट्टीवर पोलिसांची धाड : तीन आरोपींना अटक*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                 निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी  पोलीस प्रशासनातर्फे पावले उचलण्यात येत असून या अंतर्गत बरांज तांडा  येथील मोह फुलाच्या हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकून  तीन आरोपींना अटक केली आहे. सदर कारवाई  दिनांक 17 ला तालुक्यातील तांडा येथे स्थानिक गुन्हे शाखेतर्फे करण्यात आली.  या घटनेत एकूण 70 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तांडा येथे मोठ्या प्रमाणात मोह फुलाची दारू काढण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बरांज  तांडा येथे शोध मोहिम राबविली. या दरम्यान तेथे हातभट्टी आढळून आली. यात मोहफुलाच्या सडव्यासह मोह दारूचा साठा नष्ट करण्यात आला. याप्रकरणी  नीता मानसिंग बानोत, सुनिता रवींद्र पाटील व महेश लालू आमगोत यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का  सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, मधुकर सामनवार, संतोष निंभोरकर, स्वामीदास चालेकर, धनराज करकडे, अजय बागेसर, सुरेंद्र महती, रजनीकांत पुट्टावार, गणेश मोहुर्ले, प्रशांत नागोसे, शशांक बदामवार यांनी केली आहे.

Comments