वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

कोल वेतन वाढीसाठी कामगारांचे चार तास आंदोलन**जिल्हा अधीकारी कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासनानंतर आंदोलन मागे*

*कोल वेतन वाढीसाठी कामगारांचे चार तास आंदोलन*

*जिल्हा अधीकारी कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासनानंतर आंदोलन मागे*

अतुल कोल्हे भद्रावती -
              कर्नाटक ऐम्टा कामगारांचे गेल्या चार वर्षापासून केपीसीएल खाणीचे व्यवस्थापन व त्याची सहयोगी बरांज कोल माईन्स हे शोषण करत असून वेतन वाढीच्या निवड भूल-थापा देत आहे. मात्र अजूनही कोल वेतनात एकही रुपयाची वाढ केली नाही त्यामुळे इतर मागण्या घेऊन कामगारांनी आज दिनांक ३ ऑक्टोंबर ला केपीसीएल कोळसा खाणीचे उत्पादन बंद करून तब्बल चार तास खान बंद करून आंदोलन केले. कंपनी व पोलीस प्रशासन यांनी मध्यस्थी करून दि ८ ऑक्टोबरला जिल्हाधीकारी कार्यालयात तोडगा काढू या आश्वासना नंतर आंदोलन मागे घेतले.
कर्नाटक एम्टा खान कामगारांना वेज बोर्ड लावण्यात यावा कामगारांना  सेफ्टी शूज, रेष शेल्टर , सेफ्टी गॉगल , पिण्यासाठी शुद्ध पाणी , मुलांसाठी स्कूल बस , २४ तास कामगारांसाठी उपचार केंद्र, वार्षिक बोनस , घर किराया या इतर मागण्यासाठी गेल्या चार वर्षापासून कामगार लढा देत आहे या मागण्यासाठी चार वर्षात केपीसीएल कंपनी सोबत चाळीस बैठका झाल्या मात्र त्या विफल ठरल्या या करता आज दि ३ ऑक्टोबरला केपीसीएल खुल्या कोळसा खाणीत खान बंद आंदोलन पुकारले . आंदोलनाच्या चार तासा नंतर कंपणीचे अधीकारी यांनी पत्र देउन या मागण्या संदर्भात दि ८ ऑक्टेबरला जिल्हाधीकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले मात्र या बैठकीत तोडगा निघाला नाही तर ९ ऑक्टोबर पासुन पून्हा आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा कामगारानी दिला. या आंदोलनात अरविंद देवगड , विनोद आगलावे, प्रदीप मानकर, सुभाष गेडाम, महेश पेटकर, पांडुरंग सातपुते अशोक ठेंगणे, शंकर बालपने , महेश तुंबडे, रवींद्र निखाड , विलास ताजने सह असंख्य कामगार उपस्थित होते.

Comments