वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

लोकमान्य इंग्लिश मीडियम स्कूल च्या व्हॉलीबॉल संघाची नेत्रदीपक कामगिरी

लोकमान्य इंग्लिश मीडियम स्कूल च्या व्हॉलीबॉल संघाची नेत्रदीपक कामगिरी 
  
वरोरा दि ८ ऑक्टोबर 

         नागपूर येथे  संपन्न झालेल्या राज्यस्तरीय सतरा वर्षाखालील मुलींच्या शालेय व्हॉलीबाल स्पर्धेत वरोरा येथील लोकमान्य इंग्लिश मीडियम स्कूल च्या   मुलींच्या व्हॉलीबल संघाने राज्यस्तरावर तृतीय स्थान पटकावीत क्रीडा क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले.  
        याच संघातील कुमारी ईश्वरी विलास राऊत हिची महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली.     
       विजेत्या संघाचे सोमवारी वरोरा शहरातून मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले .विजेत्या संघातील खेळाडूंना लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.श्रीकांत पाटील , उपाध्यक्ष   श्रीकृष्ण घड्याळपाटील ,कार्यवाह प्रा.      विश्वनाथ   जोशी,  ऍड   दुष्यंत देशपांडे, वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन   चे अध्यक्ष   गजानन जीवतोडे , पिरके,    अविनाश   पुंड ,जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर ,   संदीप   उईके क्रीडा मार्गदर्शक चंद्रपूर ,    सुनिल बांगडे, निखिल बोबडे क्रीडा मार्गदर्शक नागपूर, लोकमान्य इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य संजय आंबुलकर,  क्रीडा शिक्षक दुष्यंत लांडगे गणेश मुसळे,    वनश्री पालमाकुलवार  तथा सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले .



Comments