पिसाळलेल्या कुत्र्याला दुर्दैवी अंत ; टिळक वार्ड येथील मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, पालिकेचे दुर्लक्ष

पिसाळलेल्या कुत्र्याला दुर्दैवी अंत ; टिळक वार्ड येथील मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, पालिकेचे दुर्लक्ष टिळकवार्ड,वरोरा, दि. २४ मार्च : शहरातील टिळकवार्ड परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या भागात फिरायला जाणारे नागरिक, लहान मुले तसेच रात्रीच्या वेळी हॉटेलवरून येणाऱ्या व्यक्तींना व रहदारी करणाऱ्या नागरिकांना कुत्र्यांपासून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अखेर गेल्या रविवारी वैभव किराणा दुकानाजवळ फिरत असलेल्या एका पिसाळलेल्या कुत्र्याचा दुर्दैवी अंत झाला. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील अनेक दिवसांपासून हा कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांना चावा घेत होता. पंधरा ते वीस व्यक्तींना व लहान मुलांना गंभीर जखमी केल्याने परिसरात लहान मुलांना खेळणेही अवघड झाले होते. विशेष म्हणजे या कुत्र्यांच्या शरीरावरील कातडी गळून पडल्यासारखी दिसत असून, त्यांना आजार झाले असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचे मोठे झुंड असून, अशा कुत्र्यांमुळे एखाद्या लहान मुलावरही हल्ला होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, अद्यापही नगरपालिका प्रशासनान...

नगर परिषद भद्रावती तर्फे भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न**सुंदर भद्रावती स्वच्छ भद्रावती शहर करण्यास सहकार्य करावे : मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांचे आवाहन*

*नगर परिषद भद्रावती तर्फे भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न*

*सुंदर भद्रावती स्वच्छ भद्रावती शहर करण्यास सहकार्य करावे : मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांचे आवाहन*

अतुल कोल्हे भद्रावती : 
               राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून 'स्वच्छता ही सेवा २०२४' या  अभियान अंतर्गत स्थानिक नगरपालिका अंतर्गत दि.१४ सप्टेंबर ते १ ऑक्टोंबर पर्यंत पंधरवाडा राबविण्यात आला.आणि
२ ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी स्वच्छ भद्रावती सुंदर भद्रावती करण्याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगरपालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांनी केले.
   दरम्यान या पंधरवाड्यात स्वच्छ भारत, स्वच्छ संस्कार स्वच्छता हे अभियान राबविण्यात आले. नगर परिषदेने शैक्षणिक
संस्था, शाळा, महाविदयालयामध्ये स्वच्छ भारत अभियानाची जागरूकता पसरविण्यासाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन तालुका क्रिडा संकुल येथे करण्यात आले. या स्पर्धेत एकुण १९ शाळांनी सहभाग नोंदविला असुन वर्ग ८ वी ते १० वी अ गट, वर्ग ५ वी ते ७ वी ब गट, वर्ग १ ला ते ४ था क गट या तिन गट निहाय चित्रकला स्पर्धेत एकूण ४०० विदयार्थ्यांनी भाग घेतला.
या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी नगरपालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी, ठाणेदार  बिपीन इंगळे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, यांचे उपस्थितीत महात्मा गांधी व लाल बहादुर शास्वी यांचे जयंतीचा कार्यक्रम घेवुन चित्रकला स्पर्धेला सुरूवात झाली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी विजयकुमार जांभुळकर यांनी केले.
या चित्रकला स्पर्धेला यशस्वी करण्याकरीता नगर परिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments