वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

*अनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरुणांसाठी ‘स्टँडअप इंडिया’ मार्जिन मनी योजना*

*अनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरुणांसाठी ‘स्टँडअप इंडिया’ मार्जिन मनी योजना*

अकूंश अवथे चंद्रपूर 

          चंद्रपूर, दि. 9 :  केंद्र शासनाच्या ‘स्टँडअप इंडिया’ योजनेंतर्गत महाराष्ट्राती अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील सवलतीस पात्र नवउद्योजक तरुणांना मार्जीन मनी उपलब्ध करून देण्याची योजना समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यातील अनुसचित जाती, वनवबौध्द प्रवर्गातील सवलतीस पात्र 18 वर्षावरील नवउद्योजक तरुणांनी 10 टक्के स्व:हिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास ‘स्टँडअप इंडिया’ योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याच्या 15 टक्के हिस्सा अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येईल.

सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय 8 मार्च, 2019  व 9 डिसेंबर 2020 अन्वये शासन स्तरावरुन निश्चीत करण्यात आल्या आहेत. सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra gov.in  संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.  जिल्ह्यातील पात्र इच्छुक नवउद्योजक तरुणांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे संपर्क साधावा व सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
००००००

Comments