शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; प्रकृती अस्वास्थ्यामुळे छोटेखानी कार्यक्रम व घरीच मान्यवरांच्या भेटीगाठी*
*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; प्रकृती अस्वास्थ्यामुळे छोटेखानी कार्यक्रम व घरीच मान्यवरांच्या भेटीगाठी*
*वाढदिवसानिमित्त दिव्यांगाना तीनचाकी सायकल, रुग्णांना आर्थीक सहकार्य, निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेतले*
*शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार व राजकीय क्षेत्रातील तसेच महाविकास आघाडी दिग्गजांची शुभेच्छांकरीता एकच गर्दी*
भद्रावती :
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांचा वाढदिवस (दि.१३) रोज रविवारला दिवसभर मान्यवरांच्या भेटी व शुभेच्छांच्या माध्यमातुन साजरा करण्यात आला. दरवर्षी मोठ्या स्वरुपात होणारा कार्यक्रम यावर्षी सुध्दा आयोजीत करण्यात आला होता, परंतु मागील एक आठवड्यापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे मोठा कार्यक्रम न घेता घरीच मान्यवरांच्या भेटीगाठी घेत शुभेच्छा स्वीकारण्यात आल्या. प्रत्येक गरजूंना आरोग्य विषयक, विकलांगाना उपयोगी वस्तु आदी मदत घरपोच करण्यात आल्या.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भद्रावती येथील मुक्ता मोरेश्वर तराळे यांची मुलगी वैष्णवी, वरोरा तालुक्यातील चिकणी येथील निता विजय देवारकर यांचा मुलगा भुषण व मुलगी मृणाली, पुष्पा देवानंद येरमे यांचा मुलगा दिव्यांश तसेच यवतमाळ जिल्हयातील मारेगाव येथील मनिषा दिलीप नवले यांची कन्या आदिती यांना शैक्षणिक दत्तक घेण्यात आले.
९० टक्के दिव्यांग असलेले स्थानिक गवराळा येथील मुकेश रमेश मंचलवार यांना तीनचाकी सायकल घरपोच देण्यात येत आहे, तसेच भद्रावती येथील रितेश चव्हान, तालुक्यातील बेलारा येथील कॅन्सररुग्ण विठ्ठल जैराम कायरकर तसेच वरोरा तालुक्यातील आशी येथील ब्लड कॅन्सर ग्रस्त रंजना संदीप गोवारदिपे व वरोरा येथील क्रिष्णकांत पान्डे यांना आर्थीक सहकार्य करण्यात आले आहे. सोबतच शिक्षणाकरीता बरांज येथील मोहन भुक्या यांचे चिरंजीव शुभम याला बीई शिक्षणाकरीता तसेच पायल राऊत हीला नर्सिंगच्या अभ्यासक्रमाकरीता आर्थीक सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले.
या प्रसंगी शुभेच्छा प्रदान करण्यास शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता, सांस्कृतिक, सहकार व राजकीय क्षेत्रातील दिग्गज मान्यवर तथा शहर व ग्रामीण भागातून सामान्य नागरीक शुभेच्छा प्रदान करण्यास उपस्थीत होते.
दरम्यान स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूर चे अध्यक्ष धनराज आस्वले, विश्वस्त श्रीमती सुषमाताई शिंदे, विश्वस्त रुपालीताई शिंदे व संपूर्ण कुटुंबाच्या तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) परिवाराच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
रविंद्र शिंदे यांच्या सहकार, सामाजिक, राजकीय जिवनाची यशस्वी वाटचाल अशीच सुरू राहो, त्यांच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात जनसेवा कार्य सतत घडत राहो, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
शुभेच्छांसाठी यावेळी मान्यवर, पदाधिकारी, महाविकास आघाडी दिग्गज नेतेमंडळी व प्रतिष्ठित नागरीक यांनी उपस्थिती दर्शवली.
Comments
Post a Comment