*ग्रामपंचायत चिरादेवी येथील पंतप्रधान आवास योजना यादीमध्ये संधीसाधूचेच नाव : मुख्य लाभार्थी प्रतिक्षेत* *गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज*
*ग्रामपंचायत चिरादेवी येथील पंतप्रधान आवास योजना यादीमध्ये संधीसाधूचेच नाव : मुख्य लाभार्थी प्रतिक्षेत*
*गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज*
अतुल कोल्हे भद्रावती -
पंतप्रधान आवास योजना ( PMAY ) मा. नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना पक्के घर उपलब्ध करून देणारी योजना देशभर राबविण्यात आली होती आणि सुंरू आहे.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत देशातील लाखो लोकांना हक्काचे घर मिळावे असा मानस मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून पक्के आणि कच्चे घराची यादी ग्रामपंचायत मार्फत मागविली जाते. ती यादी ग्रामपंचायत पाठवत असते. परंतु ग्रामपंचायत चिरादेवी येथे पंतप्रधान आवास योजनेच्या यादी मध्ये मुख्य लाभार्थी सोडून संधीसाधूचे ( जे सध्या पक्क्या घरामध्ये राहात आहेत) यांची नावे आल्याने या योजनेतील मुख्य लाभार्थी वंचित असल्याने खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे अश्याप्रकारे गावकऱ्यांमध्ये चर्चेला जोर धरला आहे. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती घेऊन या यादीतील नावे पात्र आहेत काय? कोणाच्या आर्शीवादांने यादीमधील नावे पात्र होत आहेत? याची चौकशी करून प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थींना न्याय देण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत देशातील गरिब - गरजू लोकांना पक्के घर बांधून देण्याचे स्वप्न मा. पंतप्रधान यांचं आहे. परंतु मी मागील १-२ वर्षापासून घरकुलांची वाट बघत आहे. यावेळी घरकुलांच्या यादी मध्ये ज्यांना राहायला पक्के घर आहे अश्या व्यक्तीचे नाव आहेत. परिणामी मुख्य लाभार्थी या योजनेपासून वंचित राहयला नको. त्यामुळे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याबद्दल चौकशी करण्यात यावी.
मारोती रोडे - लाभार्थी, चिरादेवी
----------------------------------------------
Comments
Post a Comment